Parth Pawar : पार्थ पवार अ‍ॅक्टिव्ह! मुंबईची जबाबदारी विश्वासू माणसाकडे देणार; अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकींचे नाव चर्चेत!

Zeeshan Siddique NCP Mumbai President : मागील काही काळापासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाबाबत पार्थ पवार निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
Parth Pawar
Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Parth Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत काही बदल होणार असल्याची चर्चा आहे. संघटनात्मक पातळीवर हे बदल होण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होणार आहे.

पार्थ पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडीत लक्ष दिले असल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठी या वेबसाईटने दिले आहे. पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळ राष्ट्रवादीच्या वाट्याला एकच जागा आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक इच्छुक असताना देखील झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली होती. आता थेट त्यांची मुंबईच्या अध्यक्षपद मिळण्याची देखील चर्चा आहे.

समीर भुजबळ यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे आमदार सना मलिक यांचे नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र, पक्षाकडून कोणाची निवड अध्यक्षपदावर करण्यात आली नव्हती. मात्र, आता झिशान सिद्दीकी यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते.

Parth Pawar
BJP Shivsena Clash: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा कमळ विरुद्ध धनुष्यबाण संघर्ष पेटला; सरनाईकांनी अचानक टाकलेल्या बॉम्बनं ठाण्यात भाजप संतापली

मुंबईत पक्षवाढीचे आव्हान

मुंबईमध्ये महायुतीमध्ये मित्रपत्र भाजप आणि शिवसेनेची ताकद आहे. त्यातुलनेत राष्ट्रवादीचे विधानसभेत एक आमदार आणि विधान परिषदेत एक आमदार आहे. मात्र, पक्षाची फारशी ताकद दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावर निवड झालेल्या नेत्याला पक्षाची मुंबईत संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे.

Parth Pawar
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचे पुन्हा वर्चस्व; 9 पैकी सात प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद फिक्स! भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com