लोक त्यांना विचारु लागलेत गद्दारी का केली : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray| त्यांच्याकडचा पैसा संपेल, पण माझ्याकडे असणारा निष्ठेचा झरा आटणार नाही.
Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray|
Published on
Updated on

कल्याण : बंडखोर आमदार आज जसे वागतायेत, ते हिंदु्त्वाला साजेसे नाही. ते म्हणत होते की, हिंदुत्व सोडले, हिंदुत्व सोडले.पण यांनी काय काय सोडले ते नाही विचारायचं. यांनी काही सोडले तरी चालते. अशी खोचक टीका शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर शिंद गटातील आमदारांवर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणच्या शिवसेना पदाधिका-यांना संबोधित केले.

यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. आता त्यांना मतदारसंघात फिरणं अवघड झालंय. लोक विचारतायत की का गद्दारी केली? आदित्य आता फिरतोय. आता उपनेत्यांचा एक दौरा होईल. मीही लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray|
…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडा; अजित पवारांचा टोला

काल सांगलीचे लोक खोके घेवून आले होते. मी म्हटलं काय आहे रे खोक्यात..सध्या खोके गाजतायत, अशी मिश्लिक टीप्पणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, त्यांच्याकडचा पैसा संपेल, पण माझ्याकडे असणारा निष्ठेचा झरा आटणार नाही. तो शिवसैनिकांमध्ये आहे. ज्या ज्या वेळी सेनेवर संकटे आली.त्या त्या वेळी सेना शतपटीने अधिक ताकदवान झाली. असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आता तुमच्या मार्गातील अडथळा आता निघून गेला. संकट नव्हे ही संधी आहे.तुमच्या आणि मातोश्रीमध्ये ज्यांनी भिंत बांधली होती ते गेले. चेले चपाटे गेले, ज्यांना मोठे केले ते गेलेत. असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेची घोषणा केली आहे. गणपती उत्सवानंतर उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रा सुरू करणार आहेत. त्यांच्या या महाप्रबोधन यात्रेची सुरुवातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यापासून होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com