Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांच्या घरी अज्ञात महिलेची एन्ट्री; फोटो-व्हिडिओ काढताना पोलिसांनी घेतले ताब्यात, मोबाईल जप्त

Pradeep Purnekar Murder Case News Update: प्रदीप पूर्णेकर कुटुंबीयांच्या घरी अज्ञात महिला फोटो-व्हिडिओ काढताना आढळली. कापूरबावडी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत मोबाईल जप्त केला.
Pradeep Purnekar Murder | Thane Crime Case
Pradeep Purnekar Murder | Thane Crime CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.पुर्णेकर कुटुंबीयांच्या घरी एक अज्ञात महिला प्रवेश करून फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गणेश नाईक घरी आले असताना ही महिला घरात असल्याचे निदर्शनास आले. प्रकार लक्षात येताच कापूरबावडी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत तिचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नाईक पुर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी घरातील एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिच्याकडे चौकशी करण्यात आली. संबंधित महिला घरातील प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमधून काढत होती.

Pradeep Purnekar Murder | Thane Crime Case
PM Modi Baramati Visit: मोदींचा बारामती दौरा ठरला! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली माहिती

याशिवाय ती व्हॉइस कॉलच्या माध्यमातून कोणाशी तरी संवाद साधत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे घरातील उपस्थितांना तिच्या घरात येण्याबाबत आणि ती नेमकी कोण आहे, याबाबत संशय निर्माण झाला.

कुटुंबीयांनी संबंधित महिलेकडे तिचे नाव आणि पत्ता विचारून तिची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी महिलेने अपेक्षित माहिती देण्याऐवजी घरातील व्यक्तींनाच त्यांची ओळख आणि आधार कार्ड दाखवण्यास सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक संशयास्पद बनली.

Pradeep Purnekar Murder | Thane Crime Case
PAT 2 Exam 2026: 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा; कोणत्या 3 विषयांची होणार चाचणी?

या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडील मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.

महिलेने पुर्णेकर कुटुंबीयांच्या घरात नेमक्या कोणत्या कारणासाठी प्रवेश केला होता, ती फोटो-व्हिडिओ का काढत होती आणि व्हॉइस कॉलद्वारे कोणाशी संवाद साधत होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

घरातील संवेदनशील प्रसंगी अनोळखी व्यक्तीने अशा प्रकारे प्रवेश करून फोटो-व्हिडिओ काढल्याने कुटुंबीयांमध्येही नाराजी आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या तपासानंतर या महिलेच्या प्रवेशामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com