Prakash Ambedkar News : काँग्रेसमधील सुपारीबाज नेते कोण? आंबेडकरांचा निशाणा कुणावर?

Prakash Ambedkar On Congress : अशा सुपारीबाजांची नावे घ्यायला आम्ही घाबरत नाही.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत असताना, महराष्ट्रात जागावाटपाचा तिढा मात्र अद्यापही सुटता सुटत नाही. एकीकडे जागावाटपावरून महायुतीत खलबतं होत आहेत, महाविकास आघाडीचीही गाडी जागावाटपावरून अडली आहे. आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या याबाबत आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे. अशातच आता वंबआचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांना सुपारीबाज म्हटल्याने आता आघाडीत आणखीनच बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे. 'तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेसमधील जे सुपारीबाज नेते आहेत, त्यांना काढून टाकावं. तुम्ही आरोप केलेले हे काँग्रेसचे सुपारीबाज कोण आहेत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar News
Bachchu Kadu : लोकसभेत सगळ्या जागा भाजप लढवेल, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा !

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, "मी हे विधान जाहीरपणे केले आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांनंतर मी सांगतो की, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोण-कोण सुपारीबाज नेते आहेत. अशा सुपारीबाजांची नावे घ्यायला आम्ही घाबरत नाही. आमची भूमिका ही रोखठोक आहे. आम्हीही रोखठोक आहोत. जेव्हा मी असं विधान जबाबदारीने करतो, तेव्हा आमची काहीतरी पक्की माहिती असते," अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे.

Prakash Ambedkar News
BJP News : भाजपची डोकेदुखी थांबेना! संगमनेरनंतर आता नेवासामध्ये धुसफूस

आमचं स्टेटस लक्षात आलंय -

आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीची (Mahavika Aghadi) बैठक तुम्ही आम्हाला न सागता रद्द करता. त्यामुळे आम्हाला जे काही समजून घ्यायचं आहे ते आम्ही समजून घेतलं. बैठकीला आम्ही येतो, बैठक रद्द करता तेही सांगत नाही. आमचं स्टेटस आघाडीच्या दृष्टीने काय आहे, हे लक्षात आलंय, असे आंबेडकर म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com