Mumbai Bank:दरेकर, धसांवर गुन्हा दाखल करा, बनावट कागदपत्राच्या आधारे कर्ज वाटप

मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे २७ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्याचा आरोप दोघांवर करण्यात आला आहे.
Suresh Dhas,Pravin Darekar
Suresh Dhas,Pravin Darekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबै बॅकेचे माजी अध्यक्ष (Mumbai Bank)आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) व बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे २७ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्याचा आरोप दोघांवर करण्यात आला आहे.

बोगस दस्तावेजांच्या आधारे तब्बल २७ कोटींचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबै बँकेचे इतर पदाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि कर्जदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Suresh Dhas,Pravin Darekar
Operation Ganga:भारतानं करुन दाखवलं ; विद्यार्थ्यांमुळेच देशाची पत वाढली!

मुंबै बँकेचे वकील, ऑडिटर यांनी सर्च रिपोर्ट न देता, मालमत्तेची शहानिशा न करता, त्यांचा अभिप्राय न घेता हे कर्ज प्रकरण मंजूर करुन 27 कोटी अदा करण्यात आलेल्याची तक्रार सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.

धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले आहेत. मुंबै बँकेने या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद व आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com