Vidhan Parishad Elections : इंडिया आघाडीकडून जयंत पाटलांना उमेदवारी; दुसरी जागा काँग्रेस लढवणार

Jayant Patil India Aghadi;s Candidate : इंडिया आघाडीने दुसरा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर केलेले आहे. तिसरा उमेदवार उभा करायचा की नाही करायचा, याची चर्चा सुरू आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Mumbai, 30 June : विधान परिषदेच्या अकरा जागांपैकी विधानसभेतील संख्याबळाप्रमाणे महायुतीला नऊ, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घाेषित केली आहे. दुसरी जागा काँग्रेसला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) अकरा जागांसाठी येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. अकरापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आले तरच निवडणूक होणार आहे. मात्र, अकरा जागेसाठी अकराच उमेदवार रिंगणात उतरले तर ही निवडणूक (Election) बिनविरोध होऊ शकते.

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच आमदार सहज निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार निवडून येतील. काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मदतीतून एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासाठी एक जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा होती. जयंत पाटील म्हणाले, इंडिया आघाडीने सुरुवातीचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात काँग्रेस पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराचे नाव आज रात्री उशिरा किंवा उद्या (ता. १ जुलै) जाहीर होईल.

इंडिया आघाडीने दुसरा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर केलेले आहे. तिसरा उमेदवार उभा करायचा की नाही करायचा, याची चर्चा सुरू आहे. त्याबाबतची बेरीज कशी होते, त्यावरच ते ठरेल. सध्या इंडिया आघाडीला महाराष्ट्रात जे वातावरण तयार झाले आहे, त्याला अपयश येऊ नये, अशी इंडिया आघाडीची भूमिका आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
Chandrakant Patil : पुढच्या आषाढीची पूजा कोण करणार?; चंद्रकांतदादांनी केला मोठा दावा

काँग्रेसकडून या नावाची चर्चा?

काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष तथा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेच्या उमेदवारासाठी सुरू आहे. काँग्रेस हायकमांड यापैकी कोणाला संधी देणार?, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

'या' आमदारांचा कार्यकाळ संपला

मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप), प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप).

Jayant Patil
Prashant Paricharak : पंढरपुरातील बैठकांतून परिचारकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की विधान परिषदेसाठी दबाबतंत्र?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com