Thackeray Vs Shinde: ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटाच्या गळाला; आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांवर नाराज असल्याने...

Kalyan Lok Sabha Constituency 2024: दरेकर यांच्या अर्ज दाखल केला तेव्हा खामकर आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. येत्या काही दिवसात खामकर हे शिंदे गटात सहभागी होतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan News: लोकसभेच्या रणधुमाळीत डोंबिवलीत ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोंबिवली ठाकरे गटातील प्रमुख नेते, पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर , कविता गावंड हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून ठाकरे गटातील अनेक जण नाराज आहेत.

Thackeray Vs Shinde
Modi Malshiras Visit: साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्नही पवारांनी सोडवला नाही; मोदींचे टीकास्त्र

शिवसेनेत फूट पडल्यानंतर विवेक खामकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. खामकर हे डोंबिवलीचे शहर प्रमुख आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरेकरांनी अर्ज दाखल केला तेव्हा खामकर आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. येत्या काही दिवसांत खामकर हे शिंदे गटात सहभागी होतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वैशाली दरेकर या आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप खामकर त्यांनी केला आहे.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या या नावाची चर्चा

  • विवेक खामकर-शहरप्रमुख

  • राजेंद्र नांदुस्कर -उपशहर संघटक

  • श्याम चौगुले -विभाग प्रमुख

  • सुधीर पवार -विभाग प्रमुख

  • शिवराम हळदणकर -विभाग प्रमुख

  • नरेंद्र खाडे -उपविभाग प्रमुख

  • सतीश कुलकर्णी -उपविभाग प्रमुख

  • प्रशांत शिंदे -उपविभाग प्रमुख

  • प्रसाद चव्हाण -शाखाप्रमुख

  • विष्णू पवार -शाखाप्रमुख

  • मयूर जाधव -शाखाप्रमुख

  • कविता गावंड- महिला जिल्हासंघटक

  • लीना शिर्के - युवती सेना जिल्हाधिकारी

  • किरण मोंडकर - उपशहर संघटक

  • राधिका गुप्ते - कल्याण पूर्व विधानसभा संघटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com