Prakash Mahajan News: मुंबई निवडणुकीच्या आधीच राज ठाकरेंना मोठा धक्का; प्रकाश महाजनांचा मनसेचा तडकाफडकी राजीनामा, गंभीर आरोपांनी खळबळ

MNS Leader Prakash Mahajan : मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसेतील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या महाजन यांनी अचानक सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी मनसेवर काही गंभीर आरोपही केले.
Prakash Mahajan
Prakash MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत देत राजकीय धक्का दिला आहे. एकीकडे याच ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शनिवारी(ता. 13) मनसेतील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या महाजन यांनी अचानक सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी मनसेवर काही गंभीर आरोपही केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना पक्षाकडून इगतपुरीत सुरु असलेल्या शिबिराला बोलवण्यात आलं नव्हतं. पक्षाला आपली गरज वाटली नसेल अशा शब्दांत महाजन यांनी यावर नाराजी व्यक्त करत आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवली होती.

महाजन म्हणाले,11 जुलैनंतर मला वाटलं पक्षाला आता आपली फार गरज नाही. मी दोन महिने वाट पाहिली, काहीतरी सकारात्मक घ़डेल. पण साधी माझी दखल कोणी घेतली नाही. दरवाजापर्यंत आणून सोडलंय. मग, तिथेच राहायचं की बाहेर पडायचं हे आपण ठरवायचं असतं अशी उद्विग्न भावनाही त्यांनी मांडली.

Prakash Mahajan
Ajit Pawar : कुर्डूतील व्हिडिओवर अजितदादा पुन्हा बोलले; म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय...'

मी एक सामान्य प्रवक्ता म्हणून तिथे होतो. माझ्यावर जेवढी जबाबदारी होती, तेवढी मी चांगल्या रितीने पार पाडली. पण गेल्या काही दिवसांत मला वाटू लागलं की आता कुठे थांबलं पाहिजे, म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला. बाकी काही नाही असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

“मला लक्षात आलं की, अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली. क्षमता असून काम मिळालं नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही. आपल्याला काहीच नको होतं. थोडाबहुत सन्मान, थोडंबहुत काम हवं होतं. एवढ्या कमीत कमी अपेक्षा जिथं पूर्ण होऊ शकत नसल्याचं सांगत त्यांनी आपली नाराजीही स्पष्टपणे बोलून दाखवली.

Prakash Mahajan
Nilesh Lanke news : विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारी नाही, उटल त्यांना..; नीलेश लंकेंकडून झेडपीचं 'प्लॅनिंग' सुरू

प्रकाश महाजन म्हणाले, मला वाटतं होतं, पक्षाच्या प्रचारात घ्यावं. पक्षसंघटनेत जबाबदारी द्यावी. पण असं काही झालं नाही. मी पक्षाच्या मेळाव्यात बोललो होतो की, आयुष्यात काही करायचं आहे, ते माझ्या नातीसाठी आणि साहेबांसाठी. पण माहित नाही का झालं नाही, कोणाला दोष देणार नाही.”

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बैठकीतील टोन बघता त्यांना माझं महत्व नाही असं वाटलं, दोन भाऊ एक यावं हे ठरवणारे तुम्ही कोण? असं ठाकरे यांनी मला म्हटलं होतं. पण त्यांना आपण दोन भाऊ एकत्र यावं असं म्हणालो, त्याचाच राग आला. मात्र दोन भाऊ एकत्र आल्यानंतर तीन तीन तास सोबत बसले. तेव्हा माझी आठवण झाली नसल्याची खंतही महाजन यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी दोन भाऊ एकत्र आले. आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आपलं काम संपलं” असंही सांगितलं.

Prakash Mahajan
Beed Crime : माजी उपसरपंचाच्या आत्महत्येमागे आर्थिक व्यवहारच, पूजाने घेतलेल्या प्लॉट खरेदीत बर्गे साक्षीदार!

प्रकाश महाजन यांनी यावेळी मला नारायण राणे यांच्या प्रकरणात कोणीही मदत केली नसल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, माझ्या बाजूने कुणीही आले नाही, मी एकटाच लढलो. मी वाट बघितली. मात्र, मला प्रतिसाद मिळाला नाही असंही त्यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरेंना बघून पक्षात आलो तेच माझ्यावर नाराज आहेत. देव बदलायचा नाही.आता आपल्याला कोण भक्त म्हणून घेईल. आम्ही ना आवडते होतो. मी बरेच दिवस अस्वस्थ होतो. मनसे सोडतांना एक अपराध वाटतो, तो म्हणजे अमित ठाकरे यांना साथ देऊ शकलो नाही. मला एक गोष्ट नाही सगळं भोवलं असल्याचंही प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

Prakash Mahajan
Chhagan Bhujbal Politics: ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू!

महाजन म्हणाले, एखादा व्यक्ती पूर्णपणे मनातून काढू शकत नाही, असे राज ठाकरे आहेत. माझं वय क्षमा करण्याचं आहे. पण मी फक्त जर मनसेत अपराधी कोणाचा असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना बोललेलो की, अमितजी मी तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत काम करेन. मनुष्य एक विचार करतो नशीब काही दुसरंच ठरवतं असंही प्रकाश महाजन यांनी यावेळी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com