Raj Thackeray: शिवसेनेच्या खासदार फुटीवर अखेर राज ठाकरे बोलले; म्हणाले, बरं झालं...

Raj Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले असून ते स्वतंत्र गट स्थापन करुन लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या चार दिवसांपासून यावरुन राज्यात घामासान सुरु आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले असून ते स्वतंत्र गट स्थापन करुन लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या चार दिवसांपासून यावरुन राज्यात घामासान सुरु असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. मनसेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी वर्षभरात देशात काहीही होऊ शकतं, यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Raj Thackeray
Pawanraje Nimbalkar Case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरण: कोर्टाकडून झटका; निकालानंतर सीबीआयचा काही मिनिटांतच मोठा निर्णय

राज ठाकरे म्हणाले, "सध्या संपूर्ण देशाचा विचका झालेला आहे, राज्याचा विचका झालेला आहे. कोणाची सत्ता आहे? कोण विरोधीपक्षात आहे? कोणाला सत्ता मिळवायची आहे? हा सगळा भाग बाजूला ठेवा पण आपण आपल्या देशाचं काय नुकसान करतो आहोत. आज देशात बेरोजगारीचं प्रमाणं इतकं वाढलेलं आहे, काही लक्ष आहे का आपलं त्याकडं? अजून पाऊस पडलेला नाही. महाराष्ट्रात दुष्काळी परीस्थिती येणार आहे. पण आपल्याकडं काय सुरु आहे तर आमदार-खासदार फोडणं सुरु आहे. आमची सत्ता कशी टिकेल आणि त्यासाठी वाट्टेल तसे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत.

Raj Thackeray
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टानं कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ओरोपींची निर्दोष मुक्तता केली? कोर्टात नेमकं काय घडलं?

मला वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नको तर लोकांनी याचा विचार करायला हवा. कारण ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही उन्हातान्हात रांगे उभे राहिले आहात. ती माणसं पन्नास-शंभर कोटींसाठी विकले जातात आणि आता जर ते परत आले तर त्यांवर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? हे ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रात-देशात सुरु आहे. भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत, म्हणूनच तुमच्यासमोर ही परिस्थिती आली आहे.

Raj Thackeray
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टानं कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ओरोपींची निर्दोष मुक्तता केली? कोर्टात नेमकं काय घडलं?

केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे, मग आत्ता शिवसेनेचे जे ६ खासदार फुटले ते भाजपत न जाता शिंदेंकडं का गेले? म्हणजे केंद्रात नेमकं काय राजकारण सुरु आहे? अमित शहा २०२९ ला स्वतःची तयारी करत आहेत. भाजपतून विरोध होण्याची शक्यता असेलच तर सगळे गट आपल्याबरोबर असलेले बरं म्हणून हे सुरु आहे. नाहीतर सगळे फुटलेले खासदार भाजपत गेले असते, हे सोप्पये ना? मग हे नेमकं काय घडतंय? मी तुम्हाला सांगतो, जो अंतर्गत वाद, ज्वालामुखी, त्रास असा सगळा गोंधळ देशापेक्षा भाजपत जास्त आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडं पण पेटलेलं आहे. एक फक्त त्यांच्याकडं नरेंद्र मोदी आहे म्हणून सगळं शांत आहे.

Raj Thackeray
Pawanraje Nimbalkar Case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरण: कोर्टाकडून झटका; निकालानंतर सीबीआयचा काही मिनिटांतच मोठा निर्णय

पण काही जण म्हणत आहेत की, वर्षभरात अनेक काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रात होतील आणि देशभरातही होतील. पण बघू तुम्हीही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे राहिलेले मला दिसले पाहिजेत. म्हणून या SIRच्या तयारीला लागा, असे आदेशही यावेळी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com