Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टानं कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ओरोपींची निर्दोष मुक्तता केली? कोर्टात नेमकं काय घडलं?

पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात अंतिम निकाल सुनवाण्यात आला. हा निकाल सुनावताना कोर्टानं गेल्या २० वर्षातील या खटल्यांचा संपूर्ण आढावा घेतला.
Pawan RajeNimbalkar
Pawan RajeNimbalkar
Published on
Updated on

Pawan RajeNimbalkar Murder Case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात अंतिम निकाल सुनवाण्यात आला. हा निकाल सुनावताना कोर्टानं गेल्या २० वर्षातील या खटल्यांचा संपूर्ण आढावा घेतला. या खटल्यात तपास कसा झाला, काय तृटी राहिल्या, याचा उहापोह यावेळी कोर्टानं केला. तब्बल दोन तास हे निकालाचं वाचन न्यायमूर्तीकडून सुरु होतं. पण कोर्टानं ज्या मुद्द्यांच्या आधारे सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली ते मुद्दे काय होते? कोर्टात आज नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

Pawan RajeNimbalkar
Om Raje Nimbalkar: वडिलांच्या हत्येचा निकाल आणखी लांबला; ओमराजे झाले भावूक! म्हणाले, राजकीय विरोधक संपत नसतो तर...

निकाल वाचताना न्यायमूर्तींनी नेमकं काय सांगितलं?

निकालाचं वाचन सुरु केल्यानंतर या निकालामागे काय काय गोष्टी कोर्टानं तपासल्या याचा सविस्तर आढावा यावेळी कोर्टानं घेतला. यामध्ये विविध कारणांमुळं या प्रकरणाचा निकाल यायला २० वर्षे लागली याची खंत कोर्टानं व्यक्त केली. या प्रकरणातील एक आरोपी पिंटू सिंग हा कोर्टात उशीरा आला त्यामुळं निकाल वाचन करायला काहीसी उशीरही झाला आहे. एका लोकनेत्याची हत्या होणं हे दुर्देवी असल्याचं यावेळी कोर्टानं म्हटलं आहे. २००२ पासून पद्मसिंह पाटील आणि पवन राजेनिंबाळकर यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचंही यावेळी कोर्टानं सांगितलं. सुरुवातीला राजकीय वैमन्यसातून ही हत्याचा झाल्याचं समोर येत होतं. या खटल्यात १२७ साक्षी कोर्टानं तपासल्या आहेत.

Pawan RajeNimbalkar
Pawanraje Nimbalkar murder case: तब्बल 4 दिवसांनंतर ओम राजेनिंबाळकर भावनविवश होत कॅमेऱ्यासमोर : कोर्टात पोहोचताच संतप्त शिवसैनिकांनीही गाठलं

यावेळी माफीचा साक्षीदार बनललेल्या आरोपीचा उल्लेख करताना कोर्टानं म्हटलं की, हा खटला या माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरच आधारित होता. पण सुरुवातीला मारहाण करुन त्याचा जबाब नोंदवला गेला होता, असं कोर्टानं यावेळी सांगितलं. तसंच त्यानंतरच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर या खटल्याला पूरक नाहीत असंही कोर्टानं म्हटलं आहे. माफीच्या साक्षीदारानं अनेक गोष्टी सांगितल्या पण त्याला आधार नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. माफीची साक्षीदार हा इंद्रापुरात राहायला होता याचे देखील पुरावे नाहीत. त्याचबरोबर इतर साक्षीदारांनी वेगवेगळ्या कथा सांगितल्या आणि त्याचा कुठलाही पुरावा नाही असंही कोर्टानं म्हटलं आहे. आरोपींनी रेल्वेनं ठिकाठिकाणी प्रवास केला असंही तपासात म्हटलं आहे पण त्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. माफीच्या साक्षीदारानं शूटर पिंटू सिंगला सुपारी दिली होती. त्यासाठी हा माफीचा साक्षीदार तीन वेळा नागपूरला गेला होता पण तिन्ही वेळा त्याच्या जबाबत विसंगती आढळून आल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

Pawan RajeNimbalkar
Education Department : ...तर अधिकाऱ्यांची खैर नाही! राज्यातील सरकारी शाळांच्या तपासणीसाठी शिक्षण विभागाचा नवा आदेश

तसंच पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासावर कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. यामध्ये कोर्टानं म्हटलं की, पोलिसांनी तपासात अनेक चुका केल्या. त्यांनी एकाही आरोपीचा मोबाईल जप्त केले नाहीत आणि त्यांचे सीडीआर देखील तपासले नाहीत. त्याचबरोबर अटक करताना आरोपीची झडती घेतली गेलेली नाही, त्याच्यावळ काय होतं का? याचा उल्लेख नाही. यावेळी कोर्टानं यावेळी माजी पोलीस आयुक्त राकेश मारीय यांचं नावही यावेळी घेतलं. मारिया यांचा जबाब पोलिसांनी का नोंदवला नाही, असंही कोर्टानं यावेळी म्हटलं आहे. कारण एका साक्षीदारांनं आपण राकेश मारिया यांना मलाबार हील इथं जाऊन त्यांच्या बंगल्यावर भेटलो होतो आणि त्यांना स्कॉचची बाटली भेट दिली होती. मारिया यांनी हे आरोप नाकारले होते, पण त्यांचा बंगलाही तिथे नसल्याचं समोर आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com