Raj Thackeray: उद्धव ठाकरेंसोबतची युती चर्चेआधीच फिसकटू नये...; राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना दिले 'हे' मोठे आदेश

Raj Thackeray On Uddhav Thackeray : एरवी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आदेश अंतिम मानणार्‍या नेत्यांनीच आता उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरुन नाराजी दर्शवली आहे. यात मनसेचे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरुन आक्रमक भूमिका घेतली होती.
Raj-Uddhav Thackeray Alliance News
Raj-Uddhav Thackeray Alliance NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा नवी राजकीय समीकरणं घडण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी टाळी दिली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिटाळी देत पुढचं पाऊल टाकताना त्यांच्या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंसोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. याचदरम्यान, आता राज ठाकरेंना (Raj Thackeray) मनसे नेत्यांना एक मोठा आदेश दिला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार असून नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांसह मनसे काही प्रमुख नेत्यांनीही उघड उघड भूमिका घेत या युतीवर सडेतोड भूमिका घेतली होती. काही नेत्यांनी तर ही अभद्र युती नको अशी टोकाची राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत माहिती दिली.ते म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या(Uddhav Thackeray) युतीच्या प्रश्नांवर 29 तारखेपर्यंत काहीही भाष्य न करण्याचे आदेश मनसे पदाधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. महाजन यांनी यावेळी राज ठाकरे हे सध्या परदेशात असून मनसे अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युतीच्या विषय हा संवेदनशील असल्याचं सांगत त्यावर 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, असं राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना सूचना केल्या आहेत.

Raj-Uddhav Thackeray Alliance News
Pooja Khedkar News: सर्वोच्च न्यायालयाचा वादग्रस्त पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय; अडचणी वाढणार?

एरवी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आदेश अंतिम मानणार्‍यां नेत्यांनीच आता उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरु नाराजी दर्शवली आहे. यात मनसेचे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकांमुळे मनसेतील खदखद बाहेर आली होती. त्याचमुळे ठाकरेंसोबतच्या युती होण्याआधीच संकटात सापडू नये यासाठी राज ठाकरेंकडून काळजी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

मनसेनं दिलं थेट आदित्य ठाकरेंनाच निमंत्रण

मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी थेट वरळीचे आमदार आदित्य च निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच आदित्य ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. मुंबईत मनसेकडून 'प्रतिपालिका सभागृह' भरवण्यात येणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Raj-Uddhav Thackeray Alliance News
Ajit Pawar crop insurance : 'खूप जणांनी आम्हाला चुना लावला'; 1 रुपयात पीक विमा योजनेबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत

या कार्यक्रमात मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार असून यात प्रति महापौरही असणार आहे. या कार्यक्रमात विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण मनसेकडून देण्यात आलं आहे.

या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून आदित्य ठाकरे,मंत्री आशिष शेलार,तसेच मंत्री उदय सामंत,आमदार आदित्य ठाकरे,खासदार वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे नेते आमदार रईस शेख यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कोण कोण यापैकी हजर राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com