Jain Community Road Controversy : धर्माच्या नावाखाली पांढरी पट्टी! रस्त्यांवरच वर्चस्व खपवून घेणार नाही; मनसे नेते संदीप देशपांडेंचा अल्टिमेटम अन् प्रशासनाची धावपळ

MNS forces BMC to remove controversial road markings Dadar after Sandeep Deshpande issues ultimatum : जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईच्या दादरमधील रस्त्यावर आखण्यात आलेली पांढरी पट्टी अखेर पालिका प्रशासनाने वेळेआधीच हटवली.
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Religious Controversy : ​मुंबईतील दादर परिसरात धार्मिक परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर नियम लादण्याच्या प्रकारावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपल्या खास ‘मनसे स्टाईल’मध्ये आक्रमक भूमिका घेत प्रशासनालाच माघार घ्यायला भाग पाडले.

जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर आखण्यात आलेली पांढरी पट्टी अखेर पालिका प्रशासनाने वेळेआधीच हटवली. त्यामुळे संभाव्य वाद टळला असला तरी या संपूर्ण प्रकरणाची मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई (Mumbai) मधील दादर पश्चिम भागात जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त जैन धर्मगुरूंच्या विहारासाठी रस्त्याच्या कडेला विशेष पांढरी पट्टी आखण्यात आली होती. मात्र ही पट्टी सामान्य नागरिकांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत मनसेने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला.

विशेष म्हणजे ही पट्टी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून जात होती. यानंतर संदीप देशपांडे यांनी तातडीने प्रशासनाला थेट इशारा देत दुपारी तीन वाजेपर्यंत ही पट्टी हटवण्याचा अल्टिमेटम दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रशासनाने स्वतः कारवाई केली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने ही पट्टी हटवेल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.

Sandeep Deshpande
Shiv Sena UBT Faces Crisis Workers : एकनाथ शिंदे निधी देतात, काम देतात, तुम्ही काय देता? अंबादास दानवेंसमोर शिवसेना ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा संतापाचा स्फोट

मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि दिलेल्या मुदतीपूर्वीच रस्त्यावरची पांढरी पट्टी हटवण्यात आली. त्यामुळे दादरमध्ये निर्माण होऊ शकणारा मोठा संघर्ष टळला.

Sandeep Deshpande
Shiv Sena UBT Crisis : ठाकरेंना मोठा धक्का? ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही, लोक स्वतःहून येतायत; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. मुंबईत प्रत्येकाला स्वतःचा धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र धार्मिक परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यांवर स्वतःचे नियम लादणे किंवा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही विकृत मानसिकता आहे. मुंबईत असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.

या कारवाईनंतर आता मुंबईत धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली सार्वजनिक जागांचा वापर, त्यावर प्रशासनाची भूमिका आणि मनसेची आक्रमक राजकारणाची शैली यावर पुन्हा एकदा मोठी राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com