Shrikant Shinde News : कल्याण लोकसभेला मनसेकडून राजू पाटील ? खासदार शिंदे म्हणाले, " स्वप्नं बघावीत; पण..."

Kalyan Dombivali Loksabha Election : '' हा डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच उभा राहणार आणि...''
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News : महायुती सरकारमध्ये गुण्यागोविंदाने नांदत असले तरी काही ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात चांगलेच खटके उडत असल्याचे लपून राहिलेले नाही. यात कल्याण - डोंबिवली मतदारसंघात तर मागील काही दिवसांपासून भाजप शिंदे गटात आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण चांगलंच तापलं आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतानाच इथे भाजप - शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यातच मनसे आमदार राजू पाटील हेही भाजप - शिंदे गटावर टीकेची संधी सोडताना दिसत नाहीत.

यातच राजू पाटील हे कल्याण लोकसभेसाठी मनसे राजू पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे. मात्र, खासदार शिंदेंनी लोकसभेच्या उमेदवारीवरून राजू पाटलांना चिमटा काढतानाच या वेळी आपण सर्व मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड तोडणार असल्याचा दावा केला आहे.

Shrikant Shinde
Kalyan Loksabha Election: खासदार शिंदेंच्या विरोधात सुभाष भोईरांनी थोपटले दंड; कल्याणमध्ये वाढदिवसाचे...

डोंबिवलीमधील पाटीदार भवन येथे म्हाडा रहिवासी सेवा संघाच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा (Shrikant Shinde) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी राजेश कदम, राजेश मोरे, महेश गायकवाड, महेश पाटील, सुजित नलावडे, कुणाल पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली.

शिंदे म्हणाले, विकासकामांविषयी ते बोलले, मला माझ्या कामाचे समाधान आहे. मी त्याचा अभिमान करून घेणार नाही. काही लोकांना कल्याण लोकसभा मतदारसंघाची काळजी वाटते. मात्र, त्यांनी कल्याण लोकसभेची काळजी करायची गरज नाही. हा डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच उभा राहणार आणि गेल्या वेळेस अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आला. नंतर साडेतीन लाखांच्या मताधिक्याने जिंकून आला. आता तुमची भर पडलेली असल्याचेही शिंदेंनी या वेळी सांगितले. (Kalyan Dombivali Loksabha Election)

'' मागील रेकॉर्ड मोडण्यासाठी...''

खासदार शिंदे म्हणाले, मागील रेकॉर्ड मोडण्यासाठी आपण सर्वजण आहात ते मला मदत करणार आहेत. आणि नक्कीच मला मदत करा, असे आवाहन त्यांनी म्हाडावासीयांना केले. आपल्याला वायफळ बडबड करायची नाही. माझ्या मतदारसंघाची चिंता काही लोकांना लागली आहे. काही लोकांनी पाच वर्षांत ऑफिसदेखील उघडलं नाही. लोकांना माहीतच नाही की, त्यांना भेटायला कुठे जायचे. एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. याचवेळी खासदारांनी पत्रकारांना बोलताना कोणाचेही कोणासोबत लावू नका. ज्यांच्यासाठी बोलतो त्यांच्यासाठीच करा, असे म्हणत मित्रपक्ष भाजपची बाजूही त्यांनी सावरून घेतली.

पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली, पण पाच वर्षांत आजपर्यंत काही कमावलं नाही. पाच वर्षे जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्नं पडायला लागली आहेत. स्वप्नं पडायला काही हरकत नाही असे म्हणतानाच त्यांनी "मुंगेरीलाल के हसीन सपने" अशी टीका आमदार पाटलांवर केली. स्वप्नं पाहिली पाहिजेत, पण त्याबरोबर हेही स्वप्न बघा की, आजी याच्यापुढे माजी लागता कामा नये याचीही दक्षता घ्या , असा टोला त्यांनी आमदार पाटलांना नाव न घेता लगावला आहे.

Shrikant Shinde
Supriya Sule at Amravati : सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार रुग्णांची खुनी !

लोकसभेला श्रीकांत शिंदेंविरोधात राजू पाटील ?

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत थेट कल्याण मतदारसंघात मनसे खासदारकीसाठी उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. पण कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात मनसे थेट आमदार राजू पाटील(Raju Patil) यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा झडू लागली आहे.

एकीकडे भाजप या मतदारसंघावर दावा करत असतानाच, सध्या भाजपने आमचा उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच असतील असे सांगितले आहे. भाजपचा विरोध मावळत नाही तोच मनसेने डोके वर काढल्याने खासदारांनी मनसे आमदारांना या कार्यक्रमात लक्ष केल्याचे दिसून आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Shrikant Shinde
Tuljapur Political News : उद्धव ठाकरेंपुढे गणेश सोनटक्केंनी रोचकरींना ठोक-ठोक ठोकलं, अन् आमदारकी गमावली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com