

BMC Election 2026 News : लोकसभा,विधानसभा यांसह प्रत्येक निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आम्ही महायुतीसोबतच असून आमच्या रिपाईंला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करायचे.पण दरवेळी भाजपकडून आठवलेंना 'सन्मानाचा नारळ' दिला जात होता. महापालिका निवडणुकीतही आठवलेंनी नेहमीप्रमाणे आपण महायुतीसोबतच असल्याची ग्वाही देताना मुंबईत रिपाईला सन्मानजनक जागा सोडण्यात याव्यात अशी मागणी केली. पण याही वेळी भाजपने (BJP) लोकसभा,विधानसभेचाच कित्ता गिरवण्याचं धोरण आखत रिपाईंला किरकोळीत काढलं. पण यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आक्रमक भूमिका घेत महायुतीविरोधातच मोठं पाऊल उचललं आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानं राजकारण तापलं आहे. बंडखोरी,नाराजीनाट्य,आत्मदहनाचा इशारा,रडारड,राजीनामा,पक्ष कार्यालयाची तोडफोड, पक्षांतर यांसारखे अनेक निर्णय घेत पदाधिकारी,नेतेमंडळी, इच्छुकांनी रौद्रावतार धारण केल्याचं दिसून आलं. नाराजीचे धक्के महायुतीतील भाजप,एकनाथ शिंदेंची शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादी, तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस,शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसेसह सर्वच राजकीय पक्षांना बसले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात शेवटपर्यंत रिपाईला झुलवत ठेवणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महायुतीला मोठा झटका दिला आहे. रामदास आठवले यांनी महायुतीने जागावाटपात आपल्याशी विश्वासघात केल्याचा आरोपही आठवलेंनी केला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असूनही त्यावर कार्यवाही न झाल्यानं आता आठवले मोठं पाऊल उचललं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईनं मुंबई महानगरपालिकेसाठी 39 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.रिपाईनं उमेदवारांची घोषणा करतानाच भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. यावेळी आठवलेंनी भाजप- शिवसेनेवर गंभीर आरोप करतानाच दोन्ही पक्षांनी आमच्या रिपाईला 7-7 जागा द्यायचं कबूल केलं होतं. मात्र,दोन्ही पक्षांच्या जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत रिपाईच्या उमेदवारांचा समावेश नसल्याचं दिसून आलं.यानंतर महायुतीत वादाचा मोठा भडका उडाला आहे.
संतापलेल्या रामदास आठवलेंनी भाजप शिवसेनेच्या धोक्यानंतर मुंबई महापालिकेत अखेरच्या क्षणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खुद्द मंत्री आणि रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली. महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी भाजपनं जंग जंग पछाडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आठवलेंच्या रिपाईला सोबत ठेवण्यासाठी भाजप काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रागिणी प्रभाकर कांबळे वॉर्ड क्रमांक 103- ईशान्य मुंबई
राजेश सोमा सरकार- वॉर्ड क्रमांक 120- ईशान्य मुंबई
हेमलता सुनिल मोरे- वॉर्ड क्रमांक 118- ईशान्य मुंबई
राजेंद्र कृष्णा गांगुर्डे- वॉर्ड क्रमांक 125- ईशान्य मुंबई
भारती भागवत डोके वॉर्ड क्रमांक 133- ईशान्य मुंबई
सतिश सिध्दार्थ चव्हाण-वॉर्ड क्रमांक 140- ईशान्य मुंबई
श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
विक्रांत विवेक पवार- वॉर्ड क्रमांक 98 उत्तर मध्य मुंबई
नम्रता बाळासाहेब गरुड- वॉर्ड क्रमांक- उत्तर मध्य मुंबई
विनोद भाऊराव जाधव- वॉर्ड क्रमांक 104- उत्तर मध्य मुंबई
स्नेहा सिद्दार्थ कासारे- (वॉर्ड 186)
रॉबिनसन मारन नायागाम- (वॉर्ड 188)
बापूसाहेब योहान काळे- (वॉर्ड 181)
सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
अभिजित रमेश गायकवाड, वॉर्ड क्रमांक- 26 उत्तर मुंबई
रेश्मा अबु खान, वॉर्ड क्रमांक 54 उत्तर मुंबई
छाया संजय खंडागळे- वॉर्ड क्रमांक 81 उत्तर पश्चिम
अजित मुसा कुट्टी- वॉर्ड क्रमांक 59 उत्तर पश्चिम
जयंतीलाल वेलजी गडा- वॉर्ड क्रमांक 65 उत्तर पश्चिम
बाबू अशापा धनगर- वॉर्ड क्रमांक 63 उत्तर पश्चिम
वंदना संजय बोरोडे -वॉर्ड क्रमांक 38 उत्तर पश्चिम
राधा अशोक यादव- वॉर्ड क्रमांक 39 उत्तर पश्चिम
प्रेमलता जितेंद्र शर्मा-वॉर्ड क्रमांक 40 उत्तर पश्चिम
धनराज वैद्यनाथ रोडे- वॉर्ड क्रमांक 43 उत्तर पश्चिम
शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.