BJP vs Shivsena : जरांगेंच्या चौकशीची मागणी करणाऱ्या रामदास कदमांच्या संपत्तीवरून भाजप नेत्याचा हल्लाबोल : "बोरिवलीपासून CST पर्यंतच्या जमिनींची माहिती..."

Ramdas Kadam Controversy : "मनोज जरांगे पाटील यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्याआधी रामदास कदमांची प्रॉपर्टी किती आहे ते त्यांनी स्वतः सांगावं," असं आव्हान देत, बोरिवलीपासून व्हीटीपर्यंत (सीएसटी) आणि मतदारसंघातल्या गावागावांत तुमच्या किती जमिनी आहेत याची माझ्याकडे माहिती आहे."
Ramdas Kadam Manoj Jarange Patil
Ramdas Kadam Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News, 26 Oct : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून सत्ताधारी भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.

कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. कदम यांनी जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवत. या दोन्ही नेत्यांची कशी जवळीक होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसंच ही ऑडिओ क्लिप एआय नसून भाजपचीच असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

कदम यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी देखील कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच आता भाजपच्या विरोधात काही बोलल्यास रामदास कदम यांना मतदारसंघात काळे झेंडे दाखवू असा इशारा दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे.

Ramdas Kadam Manoj Jarange Patil
MSRTC Employees : एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! दिवाळीपूर्वी मिळणार ८३ हजार कर्मचाऱ्यांना पगार; प्रताप सरनाईकांचे प्रशासनाला निर्देश

सूर्यकांत दळवी म्हणाले, "आपण काही बोललो की आपल्याकडे लक्ष केंद्रित होतं हा रामदास कदमांचा समज आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला समन्वय चांगला असताना रामदास कदम यांनी बोलणं चुकीचं आहे.

Ramdas Kadam Manoj Jarange Patil
Nanded Farmer Death : 10 हजारांच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला घरातून उचललं; दोन दिवसांनी फायनान्स ऑफिसमध्ये आढळला मृतदेह, कुटुंबीयांच्या आरोपाने खळबळ

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्याआधी रामदास कदमांची प्रॉपर्टी किती आहे ते त्यांनी स्वतः सांगावं," असं आव्हान देत, बोरिवलीपासून व्हीटीपर्यंत (सीएसटी) आणि मतदारसंघातल्या गावागावांत तुमच्या किती जमिनी आहेत याची माझ्याकडे माहिती असल्याचं म्हणत सूर्यकांत दळवी यांनी कदमांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता कदम यांच्यावर भाजपने थेट हल्लाबोल करत भाजपवरील टीका सहन करणार नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com