Pawanraje Murder Case Verdict : ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात निकाल, उद्धव ठाकरेंच्या गटातून पहिली प्रतिक्रिया, 'त्यांना कळलं असेल आपलं...'

Anil Desai Shiv Sena UBT Omraje Nimbalkar : पवनराजे हत्याकांडचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये 9 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay Sarkarnama
Published on
Updated on

Pawanraje Murder Case : पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल तब्बल 20 वर्षानंतर लागला. पद्मसिंह पाटलांसह नऊ आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवले. या निकालानंतर ओम राजेनिंबाळकारांना मोठा धक्का बसला आहे. सहा फुटलेल्या खासदारांसोबत ते होते. त्यामुळे ठाकरे गटातून या निकालावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

ठाकरेंचे खासदार अनिल देसाई या निकालानंतर ओमराजेंना उद्देशून म्हटले की, 'कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंना कळलं असेल की आपलं कोण? त्यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांच्याबाबत निर्णय उद्धव ठाकरे घेतील.'

'त्यांनी पक्षाची शिस्त मोडली आहे. त्या प्रकारचे वर्तन त्यांनी केली आहे. पक्षाने बोलावलेल्या मिटींगवर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे त्यांचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील.', असे देखील देसाई म्हणाले.

ओमराजेंची भूमिका काय?

ओमराजे माध्यमांशी बोलताना निकालाचा आणि सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा काही संबंध नाही. मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सध्या घेतलेला नाही. मी मतदारसंघात जाईल आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईल.

MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
Pawan rajenimbalkar murder case: निकाल विरोधात जाताच ओम राजेनिंबाळकर हताश; कोर्टाच्या बाहेर पडताच म्हणाले, 'हायकोर्टात दाद...'

...आम्हाला न्याय मिळाला

पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आम्हाला खूप मानिसक त्रास सहन करावा लागला. पण अखेर आम्हाला न्याय मिळाला आहे. डाॅक्टरसाहेबांना खूप सोसावे लागले. आमची 20 वर्ष वाया गेली. ती परत येणार नाहीत.

MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता! २० वर्षानंतर आला निकाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com