Rashmi Shukla Extension : मोठी बातमी ! पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाची मुदतवाढ

Rashmi Shukla Extension : रश्मी शुक्ला या आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत.
Rashmi Shukla
Rashmi ShuklaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police News: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. रश्मी शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. सध्या त्यांचा चार महिने कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र, याआधीच रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत.

रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक होते. यानंतर अखेर त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, पुढे न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rashmi Shukla
Pune Congress News : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी नेत्यांचे फोन बेकायदेशीर रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला होत्या. यानंतर फोन टॅपिंग प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला. यानंतर राज्याच्या पोलिस (Police) महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची वर्णी लागली.

दरम्यान, रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या जून 2024 ला सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीचा चार महिने कार्यकाळ शिल्लक असतानाच सरकारकडून त्यांना तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. आज याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रश्मी शुक्ला यांना कार्यकाळ वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. यावर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Rashmi Shukla
Congress News : आसाममधील अख्खी काँग्रेस भाजपच्या वाटेवर; मंत्र्यांनीच टाकला बॉम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com