Sada Sarvankar News : "रश्मी वहिनींनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे घरात कोंडलं," सरवणकरांनी सांगितलं कारण

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्युत्तर सुरु आहे. यातच सरवणकरांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
uddhav thackeray rashmit thackeray aaditya thackeray sada sarvankar
uddhav thackeray rashmit thackeray aaditya thackeray sada sarvankarsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. "आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून मी दिल्लीत जाईल, असं फडणवीसांनी मला सांगितलं होतं," असा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंना 'वेड' तर फडणवीसांनी 'भ्रमिष्ठ' ठरवलं. यातच आता शिवसेनेतील ( शिंदे गट ) आमदार सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी थेट रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) यांच्यावर टीका केली आहे.

रश्मी ठाकरेंनी ( Rashmi Thackeray ) उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) अडीच वर्षे 'मातोश्री'त कोंडून ठेवलं. त्यांना आदित्य ठाकरेंना पुढं आणून मुख्यमंत्री करायचा प्लॅनिंग होतं, असा खळबळजनक दावा सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी केला आहे. सरवणकरांनी थेट रश्मी ठाकरेंना लक्ष्य केल्यानं शिवसेनेकडून काय उत्तर येतं, हे पाहावं लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरवणकर नेमकं काय म्हणाले?

"त्या ( रश्मी ठाकरे ) दिसतात भोळ्या, पण अतिशय कपटी आहेत. मुलाला पुढं आणण्यासाठी आईनं केलेला अट्टहास म्हणजे उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे घरात कोंडून ठेवलं. उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवून आदित्य ठाकरेंना पुढं आणत मुख्यमंत्री करायचं हे आईचं प्लॅनिंग होतं," असं सरवणकरांनी म्हटलं आहे.

uddhav thackeray rashmit thackeray aaditya thackeray sada sarvankar
Devendra Fadnavis News : "भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल", फडणवीसांचा ठाकरेंना थेट इशारा

"फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं"

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला होता. "आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पद असेल, असं अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरलं होतं. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

uddhav thackeray rashmit thackeray aaditya thackeray sada sarvankar
Devendra Fadnavis News : "पंतप्रधान व्हावं, असं फडणवीसांचं स्वप्न होतं, पण मोदी अन् शहांनी त्यांचे पंख छाटले"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com