मुंबई - शिवसेनेतील आमदार व मंत्री मोठ्या संख्येत फुटले. त्यामुळे शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली. Shivsena News Update
आदित्य ठाकरे म्हणाले, या नालायक फुटीरवादी नेत्यांनी आपल्याला दगाफटका केला आहे. पण एक बरं झाले, घाण निघून गेली. जित तुमचीच होणार, लोक थम्स अप करत आहेत. राजकीय हेतू सोडून आपण पुतळ्यांपासून काही शिकतो का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्या सोबत आपण नव्हतो का? यामिनी ताई परवा जे बोलल्या त्यामुळे मनाला ठेच पोचली. त्यांना पुन्हा संधी देऊ नका, असे लोक सांगत होते. तरीही तिसऱ्यांदा संधी दिली. तेव्हा आपली लोक जातात पण ते बोलतात त्यांचे वाईट वाटते. जो माणूस रात्री साडेबारा वाजता येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईडीने आत टाकले तरीही मी सोबत असेन सांगतो तो सोडून जातो, या बाबतची खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस धोका देईल असे म्हणायचे ते आज आपल्या सोबत आहेत. 2 वर्षे सगळ भोगल्यानंतर हिंदुत्व आठवायला लागले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आठवतात. मागील 2 वर्षांत ते का नाही आठवले. आपण त्यांना नगरविकास सारखी खाती दिली. 20 मे रोजी त्यांना मुख्यमंत्री व्हायचे का हे विचारले साहेबांनी, नाही म्हणत रडले. गुवाहाटीत जाऊन जेथे पूर आहे. प्यायला पाणी नाही तेथे जाऊन हे निर्लज्ज मजा करत आहेत, असे आरोप त्यांनी केले.
त्यांच्या जेवणाचे दिवसाचे बिल आठ लाख आहे. हॉटेल, प्रायव्हेट विमाने कोणी दिली?12 लोक आहेत आमच्या संपर्कात जे सांगतात आम्हाला पळवून आणले आहेत. केंद्रात 2 मंत्री पद, 19मंत्री पद आणि उपमुख्यमंत्रीपद देणार आहेत. मग भाजपला काय मिळणार आहे. विकून स्वःला गेले असतील, फाईल उघडी झाली म्हणून गेले असतील तर जनतेला काय मिळाले. महाराष्ट्रात पाऊस नाही. पीक कशी काढायची हे संकट असताना कृषी मंत्री मात्र गायब. डोंगर, दऱ्या फिरत आहेत जाऊन, असे त्यांनी सांगितले.
टाटा गुलाब जे मोठे मोठे बोलायचे. पाण्याची लाईन आदिवासी भागात जाऊ असे सांगितले पण आलेच नाही.. संध्याकाळची वेळ झाली की दुसरं पाणी सुरू होते थारथरतात. केंद्रसरकारला सवाल आहे हिटलरशाही सुरू झाली आहे का? काही जाऊन सांगतात जिल्हा प्रमुखांना साहेबांनी आम्हाला पाठवले आहे. पळून गेले आणि CRPF ची सुरक्षा घेतली. सर्जरी झाली आणि त्या माणसाला सोडून पळून गेले. दुसऱ्यांदा सर्जरी झाली आणि यांची गरज होती मग हे पळून गेले. समोर आले तर मी काही बोलणार नाही डोळ्यात डोळे घालून दगा का दिला हे विचारणार. विधान भवनची पायरी चढू देणार नाही. त्यांचे सदस्य पद रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. हिंमत असेल तर राजीनामे द्या निवडणुकीत या. हरविल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.