शिंदे गटाकडून ऋतुजा लटकेंना मंत्रिपदाची ऑफर : अनिल परबांचा आरोप!

Anil Parab : आमच्याकडून निवडणूक लढणार असाल तरच त्यांचा राजीनामा मंजूर होईल.
Anil PArab
Anil PArabSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ऋतुजा लटकेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. रमेश लटके एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. लटके महापालिकेत लिपीक म्हणून काम करतात. २ सपटेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, त्यांचा राजीनामा दबावामुळे मान्य केला जात नाही, असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे.

पालिकेच्या नियमानुसार एक महिना पूर्ण झाल्याने त्यांनी १ महिन्याचा पगार कोषागरात जमा करावा लागतो. त्यांच्यावर कोणताही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर कऱण्यासाठी सर्व प्रक्रीया झाली. पण त्यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे. या दबावामुळे राजीनामा मंजूर होत नाहीये, असा थेट आरोप परब यांनी केला.

Anil PArab
भाजप विरोधात कोणी उभा राहू नये, अशी व्यवस्था ते करू शकतात : पाटलांनी काढला चिमटा

शिंदे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. आमच्याकडून निवडणूक लढणार असाल तरच राजीनामा मंजूर होईल, असं सांगण्यात त्यांना सांगण्यात आलं आहे. मंत्रीपदाचीही ऑफर त्यांना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे, असे परब म्हणाले. याविरोधात आता शिवसेना न्यायालयात जाणार आहे. आज दुपारी न्यायालयात शिवसेनेकडून याबाबत कार्यवाहीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com