Maharashtra Budget Session : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे विधीमंडळाचे सदस्य नाही. तरही त्यांच्या वक्तव्याचा विधीमंडळात नको इतका सत्ताधाऱ्यांनी कांगावा केला. त्याची दखल घेतल अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
राऊत यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. असे असेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर काय कारवाई करणार, असा सवाल ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी थेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विचारला आहे.
विधीमंडळाबाहेर सुनील प्रभू (Sunil Prabhu) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रभू म्हणाले की, "विधीमंडळाला परंपरा आहे. विधीमंडळाच्या हक्काचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे उल्लंघन होत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. राऊत यांच्या विधानावर सत्ताधाऱ्यांनी कागांवा केला. मात्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य कोणत्या प्रकारात बसते? त्यांच्या वक्तव्याची अध्यक्ष दखल घेऊन विरोधकांचा हक्क साबूत ठेवणार का?"
पुढे सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रभू म्हणाले की, "विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबर मी चहापाणी घेतले नाही, असे विधान केले. सभागृहाचे सदस्य असलेल्या विरोधी पक्षाला विशिष्ट अधिकार आहेत. त्यांना मुख्यमंत्री देशद्रोही म्हणालेत. त्यामुळे विरोधकांच्याही हक्कांचे अध्यक्षांनी संरक्षण करायला हवे. विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटल्यानंतर अध्यक्ष कसे काय सहन करतात?"
यानंतर प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाची दखल घेऊन योग्य ती कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, "विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणाले आहेत. त्यामुळे तो विधीमंडळाच्या सर्व सदस्यांचा अपमान आहे. ज्या विरोधी पक्षाला राज्यातील बारा कोटी जनतेने निवडून पाठविले आहे, त्या जनतेचा अपमान आहे. त्यामुळे त्या वक्तव्याची दखल घेऊन योग्त ती कारवाई करावी."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.