Sachin Waze Case Update: ऐन निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटी वसुली प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी सचिन वाझेला जामीन मंजूर, पण...

Sachin Waze Case Big Update : मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन वाझेला (Sachin Waze) दिलासा मिळाला आहे.अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Sachin Vaze Bail
Sachin Vaze BailSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांचं खंडणी वसुली प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. राज्याचे पोलिस महासंचालक परमबीर सिंंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी सचिन वाझेविरोधात 100 कोटी वसुली प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या खंडणी वसुली प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. आता उच्च न्यायालयाने वाझेला दिलासा देतानाच त्याला जामीन मंजूर केला आहे.

मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन वाझेला (Sachin Waze) दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीनाच्या अटी-शर्थी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेनं उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारीही वाझे याने दर्शवली होती; मात्र, ईडीने याला विरोध दर्शविला होता.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वाझेला जामीन मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Sachin Vaze Bail
Pune Assembly Election : विद्यमानांना धाकधूक, इच्छुकांचे देव पाण्यात, कुणाला उमेदवारी?

आरोपी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ॲड. रोनक नाईक यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनिल देशमुखानंतर न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात येणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अखेर जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीनंतर वाझेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार आहे.वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ॲड. रोनक नाईक यांच्यामार्फत अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com