Sachin Waze : सचिन वाझेचं 'टायमिंग' कुणाला आगीतून फुफाट्यात नेणार, फडणवीस की देशमुख?

sachin waze anil deshmukh devendra fadnavis : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कारागृहात डांबता येईल, असे आरोप शपथपत्रावर करा, असा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवला होता, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.
sachin waze  anil deshmukh devendra fadnavis
sachin waze anil deshmukh devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Sachin Waze News: गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात असलेला बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात वाझे हा देशमुखांच्या विरोधात माफीचा साक्षीदार बनला. आता त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणात 13 महिने कारागृहात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर आले. त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचे पुरावे तपासयंत्रणांना सादर करता आले नाहीत, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना नोंदवला. देशमुखांवर केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित होते, असे परमबिर सिंग हेही मागे एकदा म्हणाले होते. न्या. चांदीवाल आयोगाने देशमुख यांना या प्रकराणात क्लीन चिट दिली होती.

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, हे शपथपत्रावर लिहून द्या, तुमच्या मागे तपासयंत्रणांचा ससेमिरा लागणार नाही, असा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला होता, असा आरोप देशमुखांनी केला होता. हा निरोप घेऊन समित कदम आले होते, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी नुकताच केला आहे.

sachin waze  anil deshmukh devendra fadnavis
Devendra Fadnavis : सचिन वाझेच्या देशमुखांबाबतच्या ‘त्या’ पत्रावर फडणवीसांचा नवा स्टॅंड; ‘...तर निश्चित चौकशी होईल’

गृहमंत्री असताना अनिल देशमुख हे त्यांच्या स्वीय सहायकामार्फत (पीए) पैसे स्वीकारायचे, असा आरोप सचिन वाझे याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना शनिवारी केला आहे. कारागृहात, कोठडीत असलेल्या आरोपीला वृत्तसंस्थेशी किंवा माध्यमाशी बोलता येते का? हाही वादाचा विषय आहे. सचिन वाझे हा गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात आहेत.

वाझे आत्ताच का बोलले?

आज जी माहिती त्याने एका वृत्तसंस्थेला दिली, ती त्याला यापूर्वीच पोलिसांना, तपासयंत्रणांना देता आली असती, न्यायालयात सादर करता आली असता. मात्र तसे न करता तो वृत्तसंस्थेशी का बोलला असेल, अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याबाबत गौप्यस्फोट केल्यानंतरच वाझे कसा बोलला, यापूर्वी त्याने हे आरोप का केले नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबतचे पुरावे देवेंद्र फडणवीस आणि सीबीआयकडे दिले आहेत, असेही वाझे याने म्हटले आहे. पुरावे असतानाही फडणवीस यांनी कारवाई का केली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

देशमुखांमुळे फडणवीसांची कोंडी

अनिल देशमुख यांनी केलेल्या गौफ्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाली होती. ते बॅकफूटवर गेल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना कारागृहात डांबण्यासाठी त्यांच्यावर गंभीर आरोप करा, असा फडणवीस यांचा निरोप घेऊन आलेल्या व्यक्तीचे नावच त्यांनी जाहीर केले होते. याबाबतचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे, असेही देशमुखांना स्पष्ट केले होते. समित कदम असे त्यांचे नाव असून, ते जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. असे असले तरी ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचा अनेक संस्थांशी संबंध आला होता. तसा तो प्रत्येक मुख्यमंत्र्याचा येतो. आपण फडणवीस यांचे निकटवर्तीय आहोत, असे समित कदम यांनी अनेक संस्थांमध्ये जाऊन भासवले होते, असे सांगितले जाते. समित कदम यांच्या फेसबुक वॉलवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात. कदम यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले होते. फडणवीस यांच्याकडे मध्यस्थी करण्यासाठी देशमुखांनीच आपल्याला त्यांच्या घरी बोलावले होते, असे ते म्हणाले होते. जर हे खरे असेल तर देशमुख यांनी कदम यांनाच का बोलावले, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे आणि खूप काही सांगून जाणारा आहे. त्यामुळेच फडणवीस बॅकफूटवर गेले होते आणि त्यानंतर आता वाझे याने देशमुखांवर आरोप केला आहे.

sachin waze  anil deshmukh devendra fadnavis
Uddhav Thackeray : '... आता धनुष्यबाण हटवा', उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश !

वाझे जे बोलला त्यामागे फडणवीस?

वाझे जे बोलला त्यामागे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. वाझे यांच्यावर खुनाचे दोन आरोप आहेत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने आपल्याला जामीन देताना नोंदवला होता, याची आठवण देशमुख यांनी फडणवीस यांना करून दिली आहे. वाझे याला वृत्तसंस्थेशी बोलण्याची परवानगी कशी मिळाली. ती मिळाली तर आताच कशी मिळाली, असे प्रश्न आहेत. लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले तर अडचण सत्ताधाऱ्यांचीच होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अवस्था आगीतून फुफाट्यात अशी तर होत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By Roshan More)

sachin waze  anil deshmukh devendra fadnavis
Uddhav Thackeray News : वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com