Sada Sarvankar : भाजपकडून अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी दबाव? सरवणकरांनी ठणकावलं; म्हणाले,'मी निवडणूक लढवणारच अन्...'

Sada Sarvankar On Mahim Constituency Election 2024 : विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी शनिवारी (ता.26) सुरू असलेल्या उमेदवारी मागे घेणार असल्याच्या चर्चांवर मौन सोडलं.ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीही उमेदवारी मागे घ्यायला सांगणार नाहीत.
Sada Sarvankar Amit Thackeray .jpg
Sada Sarvankar Amit Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तसेच त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. त्याचीच परतफेड म्हणून आता माहिममधून मनसेची उमेदवारी जाहीर झालेल्या राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सूर भाजप नेत्यांनी आळवायला सुरुवात केली आहे.

पण माहिममधून अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सरवणकरांची उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे मागे घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण याचवेळी सरवणकरांनी आपण लढणारा नेता असून आपण ही विधानसभा लढणारच असं ठणकावून सांगितलं आहे.

विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी शनिवारी (ता.26 ) सुरू असलेल्या उमेदवारी मागे घेणार असल्याच्या चर्चांवर मौन सोडलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.ते मला कधीही उमेदवारी मागे घ्यायला सांगणार नाहीत. माझ्यावर कोणताही दबाव नाही. बाळासाहेबांचे विचार आम्ही वाढवतोय. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी मला सांगितले आहे की, आपल्याला काही करुन जिंकायचे आहे. त्यांनी हे पण सांगितले की, वाटेल त्या परिस्थितीत आपला उमेदवार निवडून यायला हवा असंही सरवणकर यावेळी म्हणाले.

सरवणकर म्हणाले, आपण इतकी वर्ष बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिले आहेत. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशीर्वाद दिलेत. त्यांची इच्छा एकच आहे की, बाळासाहेबांच्या विचारांचा उमेदवार निवडून यावा. ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर विरोध केला, त्यांना सोबत घेऊन काही लोक काम करत आहेत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.पण माहिम विधानसभेवर भगवा कायम राहो, असं आपण काम करु असाही दावा सरवणकर यांनी केला.

Sada Sarvankar Amit Thackeray .jpg
Parbhani Assembly Constituency : शिवसेनेचा भाजपच्या 'आनंद'वर 'भरोसा', पक्षप्रवेश झाला, उमेदवारी मिळणार का ?

ज्या काही अफवा पसरवल्या जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका. आपण सोमवारी याच ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत. त्याची जोरदार तयारी करा. बाळासाहेबांचे विचार पूर्ण करा. कोणाशी वाद घालू नका. अफवा निवडणुकीमधलं शस्त्र असतं, त्यावर विश्वास ठेवू नका असंही सरवणकरांनी यावेळी सांगितलं.

आपण लढणारा शिवसैनिक असून मागच्या दरवाज्याने येणारा नाही.माझ्यावर कोणताच प्रेशर नाही. मी लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी आहे. मी 30 वर्ष केलेलं काम हे विजयी करण्यासाठी भरपूर आहे.आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला आहे.ते नक्की विचार करतील.संघर्षातून आम्ही शिवसेना उभी केली आहे. मी निवडणूक लढवणार आणि माघार घेणार नाही असा इरादाही शिवसेनेचे आमदार सरवणकरांनी यावेळी बोलून दाखवला.

Sada Sarvankar Amit Thackeray .jpg
Nawab Malik: निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या मलिकांबाबत अजित पवार मोठा निर्णय घेणार

सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार हे माझे आणि राज ठाकरेंचेही मित्र आहेत. त्यामुळे आता त्यांनी मैत्रीसाठी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील, तर तो त्यांचा भाग आहे. केसरकरसाहेब आणि आपण कधी कधी भेटत असतो,तशी आजही भेट झाली.पण या भेटीत यावर काहीही चर्चा झाली नाही, असंही सरवणकरांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com