Mumbai News : टोल नाक्यावर कॅमेरे लावायला राज ठाकरे काय जावई आहेत का...? टोलवाल्यांचे राज ठाकरे काय मालक झाले का...? त्यांचं कर्तृत्व आणि पार्श्वभूमी काय...? असे सवाल मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलता बोलता राज ठाकरेंवर घसरलेल्या ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केले. तसेच, त्यांच्यावर बोलण्यासारखे माझ्याकडे खूप आहे, असा गर्भित इशाराही दिला. (Gunratna Sadavarte criticizes Raj Thackeray while speaking against Maratha reservation)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढला आहे. त्याला विरोध करताना माध्यमांशी बोलताना सदावर्ते हे राज ठाकरेंवरच घसरले. (Sadavarte Attack Raj Thackeray )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाला विरोध करण्यात आल्यामुळे ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला सदावर्ते यांच्या सुरक्षेवर वीस लाख रुपये खर्च येत आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारला सवाल केला आहे. प्रत्येक महिन्याला सदावर्तेंवर वीस लाख खर्च करायला ते काय सरकारचे जावई आहेत का?, असा सवाल केला आहे. त्याला उत्तर देताना सदावर्ते हे राज ठाकरेंवर घसरले.
ॲड सदावर्ते म्हणाले, टोल नाक्यावर किती कॅमेरे लावले आहेत?, किती नोटा मोजल्या जात आहेत?, हे बघायला राज ठाकरे कोण आहेत? टोलवाल्यांचे राज ठाकरे काय मालक झाले आहेत का? राज ठाकरेंचे कर्तृत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर खूप बोलू शकतो. पण आज ती वेळ नाही. आज तो विषय नाही.
मनसेने टोलनाके बघावेत आणि त्यांनी टोलनाक्यावर किती पैसे मोजले गेले हे बघावे. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्याएवढं आणि माझ्यावर टीका करण्याएवढे ते मोठे नाहीत. ‘वन टू वन’ राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या, मी सांगतो. छोटे छोटे कार्यकर्ते येत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही, असेही सदावर्ते यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाला विरोध करताना सदावर्ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, त्यामुळे या अध्यादेशामुळे कोणी हुरळून जाऊ नये. अध्यादेशाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे. मराठा बांधवांनी दिशाभूल करून घेऊ नये.
मनोज जरांगे पाटील यांचे ज्ञान काय?, हेच मला माहिती नाही. ते कोणत्या विधी महाविद्यालयातून पास झालेले आहेत? किंवा त्यांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे. त्यांनी यासंदर्भात कोणती याचिका दाखल केलेली आहे का? मराठा समाजात अनेक विद्वान लोक आहेत. विनोद पाटील, दत्ताभाऊ पाथ्रीकर ही मोठी माणसं आहेत, त्यांनी म्हटलं तर मी समजू शकतो. जरांगेंच्या बोलण्यावर टीआरपी मिळू शकतो. पण कायद्याची पुस्तके वाचणारी आमच्यासारखी लोकं कायद्याच्या मर्यादेत काम करणारी आहोत, असेही सदावर्ते यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.