
Salman Khan security : बॉलिवूडचा सुपरस्टार दबंग सलामान खानला मागील काही महिन्यांपासून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवस अगोदर तर त्याच्या घरासमोर गोळीबारही झाला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हा हल्ला झाला असल्याचे समोर आले होते. खरंतर आतापर्यंत या प्रकरणी सलमान खान याने कधीच उघडपणे प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता सलमान खान याने अखेर या प्रकरणी मौन सोडलं असून एक मोठं विधान केलं आहे.
सलमान खानला वारंवार लॉरेन्स बिश्नोई(Lawrence Bishnoi) गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने, त्याची सुरक्षा वाढवली गेली आहे. शिवाय, त्याला सार्वजनिक ठिकाणी फार जाणेयेणे कमी करावे लागल्याचे दिसून येत आहे. सध्या सलमान त्याच्य सिकंदर या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. यासंदर्भात त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्याची वाढवण्यात आलेल्या सुरक्षेवरून त्याला प्रश्न विचारला गेला होता.
सलमान खान(Salman Khan) म्हणाला, ‘’वाढलेल्या सुरक्षेमुळे दैनंदिन कामातही अडथळा येत आहे. सुरक्षेबाबत मी काहीच करू शकत नाही. शुटींग असल्यास मी गॅलक्सीवरून शूटला जातो आणि शूटवरून गॅलक्सीला परत येतो.’’ खरंतर सलमान खानला धमकी मिळण्याआधी तो बिनधास्तपणे अगदी सायकलने रस्त्यावर चक्कर मारतानाही दिसायचा.
यानंतर सामूहिक मुलाखतीवेळी जेव्हा सलमान खानला विचारले गेले की, तो त्याच्या सुरक्षेवरून चिंतीत आहे का? तेव्हा सलमान म्हणाला, ''भगवान, अल्लाह सर्व आहेत. नियतीने माझ्या नशीबात जेवढं आयुष्य लिहून ठेवलंय, तेवढं जगेन. बस्स हेच आहे. कधीकधी एवढी सगळी लोकं सोबत घेऊन चालावं लागतं, बस्स तेव्हाच अडचण निर्माण होते.''
आसपास सुरक्षा वाढवण्याबाबत सलमानला जेव्हा विचारणा झाली तेव्हा तो म्हणाला, तुम्ही लोक खूप चांगले आहात, त्यामुळेच ते तुमच्यासोबतही चांगले आहेत. मला नाही वाटत की त्यांनी त्या लोकांसोबतही चांगलं वागावं जे चांगले नाहीत.
एप्रिल 2024मध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन शुटर्सनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. यानंतर सलमान खानच्या घराच्या बालकनीवर बुलेटप्रुफ काच बसवली गेली. घराबाहेर सीसीटीव्ही बसवले गेले आणि सुरक्षा वाढवली गेली.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.