मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सॅम डिसोझाने (Sam D'Souza) आज उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली. अटकपूर्व जामिनासह अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याने केली आहे. आता या प्रकरणात डिसोझाने नवीन गौप्यस्फोट केला असून, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना क्लिनचिट दिली आहे.
आर्यनच्या सुटकेसाठी सॅम डिसोझाने मध्यस्थी केली होती. त्याने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्यात समझोता घडवून आणला होता. या प्रकरणी गोसावीने आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना त्याने पुष्टी दिली आहे. आर्यनला सोडण्यासाठी 50 लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्याने केला आहे. नंतर त्याने हे पैसे ददलानीकडे तिच्या पतीच्या मार्गे परत पोचतील, याचीही काळजी घेतली होती, असेही म्हटले आहे.
डिसोझाने समीर वानखेडे यांनाही क्लिनचिट दिली आहे. किरण गोसावी आणि साईल हे फसवणूक करणारे आहेत, असा आरोप त्याने केला आहे. आर्यनला सोडण्यासाठी वानखेडेंना पैसे देण्यात आल्याचा दावा साईलने केला आहे. याचबरोबर वानखेडे यांनी कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास सांगितल्याचेही साईलने म्हटले होते. किरण गोसावीने प्रभाकर साईलचा मोबाईल नंबर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने सेव्ह केला होता, असा दावा आता डिसोझाने केला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने सॅम डिसोझा आणि गोसावी यांचे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा केला होता. त्यानंतर यात सॅम डिसोझाचे नाव पुढे आले होते. आर्यनला सोडवण्यासाठी जी डील झाली, त्यात शाहरुखकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते, त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार असल्याचेसाईलने म्हटले होते. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने ही डील केली होती.अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप सॅम डिसोझावर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.