Bhaskar Jadhav: विरोधी पक्षनेतेपदासाठी रुसून बसलेल्या भास्कर जाधवांबाबत राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, 'कधी कधी ते...'

Bhaskar Jadhav opposition leader post: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रचंड आग्रही असून त्यांना सातत्यानं वेटिंगवर ठेवण्यात येत असल्यानेच ते गेल्या काही दिवसापासून नाराजही आहेत.
Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Bhaskar Jadhav, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरु होत आहे. मात्र,गेल्या आठ महिन्यांपासून विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा होणार का याकडे लक्ष लागले आहे. याचदरम्यान,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रचंड आग्रही असून त्यांना सातत्यानं वेटिंगवर ठेवण्यात येत असल्यानेच ते गेल्या काही दिवसापासून नाराजही आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राईट हँड असलेल्या खासदार संजय राऊतांनी आता कोकणातील पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधवांविषयी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यांनी भास्कर जाधव हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे प्रक्षोभकपणे मनमोकळं केलं असेल असं म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'साम' वृत्तवाहिनीला स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यापासून अनेक मुद्द्यांवर त्यांच्या नेहमीच्या शैलीत भूमिका स्पष्ट केल्या. यावेळी त्यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबतही भावना व्यक्त केल्या.

संजय राऊत म्हणाले,कधी कधी ते त्यांच्या स्वभावानुसार प्रक्षोभकपणे मनमोकळं करतात. हे आम्ही सुध्दा पाहिलं आहे. हे प्रत्येक पक्षात होत असतं. अगदी भारतीय जनता पक्षातही होतं. असतात ना एकएकांचे स्वभाव, ऐकून घेतलं पाहिजे, असंही राऊत यांनी म्हटलं.

Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Eknath Shinde Shivsena: ठाकरेंनी दुखावलेल्या तडफदार नेत्याला राजेश क्षीरसागरांनी हेरलं; मुंबईत फिरलं कोल्हापूरचं राजकारण

संजय राऊतांना ज्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधवांचं नाव दिलंय,पण विरोधी पक्षनेताच सत्ताधाऱ्यांसोबत जातो असा महाराष्ट्राचा इतिहास आहे,पण तुमचा नेता विरोधी पक्षनेता होण्याआधीच सत्ताधाऱ्यांसोबत जाणार की काय या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले,ते आज सकाळीच उद्धव ठाकरेंसोबत होते असं ते म्हणाले. ते विरोधी पक्षासोबत रविवारी(ता.29) नव्हते यावर बोलताना ते त्यांच्या मतदारसंघात जास्तवेळ असतात. आज ते सकाळपासून उद्धव ठाकरेंसोबत होते. आझाद मैदानावर आमच्यासोबत होते. त्यांच्याविषयी तुम्ही लोकं चुकीचं विधानं करत असतात,असं पलटवारही राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले,सरदार आमदार,खासदार येत असतात,जात असतात. पण शिवसेना ही तळागळातल्या शिवसैनिकांवर उभी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी या लोकांना सरदार केलं. बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, माणसांची सरदार केलं.असं मी नेहमी म्हणतो. त्याच सरदारांनी पाठीत खंजीर खुपसला, अशी टीकाही राऊतांनी केली.

Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Bhaskar Jadhav :'मातोश्री'कडूनच भास्कर जाधवांचे विरोधी पक्षनेतेपद 'वेटिंग'वर? नाराजीचे कारण वेगळेच...

हे राजकारणात होतंच असतं.यांच्या महत्त्वकांक्षा एवढ्या टिपेला गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ता गोळा केल्या आहेत. मग जमवलेली संपत्ती किंवा कुटुंबाला वाचवण्यासाठी मग नीतीमत्ता,मग आम्हांला विचारलं जात नाही, पक्षामध्ये आमचा आवाज ऐकला जात नाही, तुमचा आवाज ऐकूनच तर तुम्ही इकडे श्रीमंत आणि संपत्तीसम्राट झालात ना, असेही राऊत म्हणाले.

तुम्हाला जे आज आमदार, खासदार केलंय, ते आम्ही केलंय. म्हणून तुम्ही झालात ना. नाहीतर संजय राऊत कोण आहे. आज मला 25 वर्षे खासदार कुणी केलं. शिवसेना पक्षानेच ना.राज्यसभेत पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मला कुणी दिली हे विसरता येणार नाही,असंही राऊत यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com