Shivsena Politics : मुंबईचं महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार? ठाकरेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया,...

Shiv Sena to Get Mayor's Post After BJP's 2.5-Year Tenure : मुंबईचे महापौरपद सव्वावर्षांसाठी एकनाथ शिदेंच्या शिवसेनेला मिळण्याची चर्चा आहे. त्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarakarnama
Published on
Updated on

Shiv Sena to Get Mumbai Mayor Post : मुंबई महापालिकेचे महापौर पद शिवसेनेकडे येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अडीच वर्षांच्यानंतर शिवसेनेकडे सव्वावर्षांसाठी हे पद असेल, असे ते म्हणाले. या विषयी एका मराठी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

शिंदेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, 'मिंधे गटाचा जो इतिहास आहे, तो सत्ता विकत घेण्यासंदर्भात बदनाम आहे. सव्वा वर्षाचं महापौरपद विकत घेण्यासाठी त्यांनी सव्वाशे कोटी रुपये मोजले की सव्वा हजार कोटी रुपये मोजले, याची माहिती मी घेत आहे.'

'त्यांना काहीही फुकट मिळालेलं नाही. आता जो काही डोलारा आहे, तो सगळा विकतचा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे मोजतात. मुंबईचं महापौरपदसुद्धा किती खोक्यांना विकत घेत आहेत, याची माहिती दिल्लीतून लवकरच येईल. त्यामध्ये लपून राहण्यासारखं काहीही नाही. भाजपमध्ये महाराष्ट्रप्रेमी खूप लोक आहेत. अशी माहिती जनतेसमोर यावी, यासाठी ते जास्त प्रयत्न करत असतात.', असे देखील राऊत म्हणाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषा शिकण्याबाबतच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलला. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, परिवहन मंत्र्यांच्या हातात काहीही नाही. ते एका पक्षाचे मंत्री आहेत आणि त्या पक्षाची सूत्रं दिल्लीतून हलवली जातात. त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यामुळे अमित शहा जो निर्णय खाली पाठवतील, तो त्यांना स्वीकारावा लागेल. मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यासाठी परिवहन मंत्र्यांनी जो प्रचार केला, मुलाखती दिल्या, वर्ग सुरू केले आणि कारवाईच्या सूचना दिल्या, परवाना रद्द करण्याचं सांगितलं, तो एक धोरणात्मक निर्णय होता.'

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena UBT : सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागताच; उद्धव ठाकरेंना दुसरा 'सचिन' मिळाला, संघटनेत दिली मोठी जबाबदारी

'बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी भूमिका आहे, ती काही त्यांची स्वतःची भूमिका नाही. पण तुम्ही एक निर्णय घेतल्यानंतर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकल्यानंतर शेपूट का घातलं? तुम्ही बंड केलं पाहिजे. मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे.', असे देखील ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसच बाॅस, शिंदेंना टोला

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इतर सहकारी पक्षांना आणि सरकारमधील सहकाऱ्यांना ठासून सांगायला हवं होतं की, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन तेच या मंत्रिमंडळात अंतिम असेल. मुख्यमंत्री हा सरकारचा नेता असतो. त्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्या, तरीही मी इथे बॉस आहे आणि माझा निर्णय अंतिम राहील, हे त्यांनी काल रिक्षाचालकांच्या संदर्भातील निर्णयातून दाखवून दिलं आहे. इतर काही विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, हे मला माहिती आहे. मग ते क्लस्टरच्या संदर्भातील असोत किंवा बांधकाम व्यवसायाशी संबंधित असोत. ‘मी बॉस आहे’ हे दाखवण्यासाठी ते हे करत आहेत.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Mumbai Mayor : मुंबई महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंचे ‘मिशन टायगर’? शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांवर नजर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com