Shivsena UBT : सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागताच; उद्धव ठाकरेंना दुसरा 'सचिन' मिळाला, संघटनेत दिली मोठी जबाबदारी

Sachin Padwal Appointed Pune District Contact Chief : उद्धव ठाकरेंनी आपल्या संघटनेची पुणे जिल्ह्यात ताकद वाढवणे, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय संघटना मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आता सचिनपडवळ यांच्यावर सोपवली आहे.
Uddhav Thackeray | Pune Shiv Sena | Sachin Padwal Pune District Contact Chief
Sachin Padwal has been given the responsibility of coordinating Shiv Sena's organisational work across 21 assembly constituencies in Pune district.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 28 Aug : आगामी २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापासून संघटनेत महत्त्वाचे बदल केले जात असल्याचं दिसत आहे. नुकतंच ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले नेते सचिन अहिर यांच्याकडे असलेली पुणे जिल्ह्याची जबाबदारी आता नव्या नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.

शिवडीतील शिवसेना नेते आणि नगरसेवक सचिन पडवळ यांच्यावर पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. सचिन अहिर यांच्याकडे यापूर्वी पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी होती. मात्र, त्यांच्या जागी आता सचिन पडवळ यांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील संघटनात्मक रचनेत मोठा बदल केला आहे. पडवळ यांच्याकडे केवळ एका विधानसभा मतदारसंघाची नव्हे, तर बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तब्बल २१ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२०२९ च्या तयारीसाठी संघटनेची नवी बांधणी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केल्याचे या निर्णयातून दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवणे, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय संघटना मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आता पडवळ यांच्यावर असणार आहे.

Uddhav Thackeray | Pune Shiv Sena | Sachin Padwal Pune District Contact Chief
Dharashiv Politics : 'एक कोटींचा गद्दार'! ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंसोबत जाताच भावाचा ओम राजेंनिंबाळकरांवर खळबळजनक आरोप

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांचा समन्वय एका नव्या चेहऱ्याकडे सोपवून उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी संघटनेत बदलाचे संकेत दिले आहेत. सचिन पडवळ हे शिवसेना ठाकरे गटाचे शिवडी परिसरातील माजी नगरसेवक आहेत.

Uddhav Thackeray | Pune Shiv Sena | Sachin Padwal Pune District Contact Chief
Supriya Sule : रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक; अजितदादांचे 'ते' फोटो शेअर करत म्हणाल्या, "तू कुठूनतरी अचानक येशील..."

शिवडी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. पक्षाशी सातत्याने निष्ठा राखणारे शिवसैनिक म्हणून पडवळ यांची ओळख आहे. त्यामुळे पुण्यासारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने पक्षांतर्गतही या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे.

अहिरांच्या जबाबदारीची नवी वाटणी

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांच्याकडे यापूर्वी पुणे जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांच्या पक्षबदलानंतर रिक्त झालेली ही जागा आता सचिन पडवळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिर यांच्यावर ठाकरे यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र, त्यांच्या जाण्यानंतर आता ठाकरे यांनी संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com