Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप; म्हणाले, "त्यांच्याकडे चुकीची माहिती..."

Maharashtra Political Controversy On Mahadji Shinde Award : "शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं. राजकारण आम्हाला देखील कळतं पण राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात. ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. ही आमची भूमिका आहे."
Sharad Pawar, Eknath Shinde, Sanjay Raut
Sharad Pawar, Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे आभार मानले.

तसंच पवारांवर इतरांवर राजकीय गुगली टाकली. पण माझ्यावर कधी अशी गुगली टाकली नाही आणि भविष्यातही ते टाकणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. तर याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरून कौतुक केलं. मात्र, पवारांनी शिंदेंचं केलेलं कौतुक ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे.

शरद पवारांनी जायला नको होतं...

कारण या पुरस्कारावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे. राजकारण आम्हाला देखील कळतं पण राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात. ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. ही आमची भूमिका आहे.

Sharad Pawar, Eknath Shinde, Sanjay Raut
Sanjay Raut on Sharad Pawar : "आम्हालाही राजकारण कळतं पण..." शिंदेंचा सत्कार ठाकरेंच्या जिव्हारी; राऊतांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल

आम्ही राज्यातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर आणि वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शिवाय आपण जेष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली आणि राज्य कमजोर केलं अशांना आपण सन्मानित करता.

अशामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, असं राऊत म्हणाले. तर याच कार्यक्रमात शरद पवारांनी, ठाण्याचं (Thane) राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केल्याचं वक्तव्य केलं होतं.

Sharad Pawar, Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, "त्यांनी शेजारी बसलेल्यांवर गुगली टाकली, पण..."

पवारांना याबाबतची माहिती नसेल

यावर राऊतांनी आक्षेप घेत शरद पवारांकडे चुकीची माहिती असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेंनी नव्हे तर शिवसेनेने केला. ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. शिवसेनेच्या 30 वर्षांच्या राजवटीत ठाण्याचा विकास झाला. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात खूप उशीरा आले. शरद पवारांना याबाबत माहिती नसेल, तर आम्ही ती पाठवून देऊ. शिंदे उशीरा आमदार झाले, ते ठाण्याचा राजकारणात आल्यापासून ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली. ठाणे शहर बिल्डरांच्या घशात गेले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com