Sanjay Raut : पवारसाहेब नटसम्राट तर भुजबळ फिरता रंगमंच..., संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut On Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट आरक्षणाव संदर्भात घेतली असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Sanjay Raut
Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 July : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. ही भेट आरक्षणाव संदर्भात घेतली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, भुजबळ आणि पवार यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच आता पवार-भुजबळ भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारसाहेब हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर छगन भुजबळ राजकारणातला फिरता रंगमंच आहेत, असं म्हणत राऊत यांनी भुजबळांवर बोचरी टीका केली.

मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात पवारसाहेब काय आहेत हे कळेलच. भुजबळ (Chhagan Bhujbal) मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामं केलं, ते नाटक निर्माण करतात. छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत," अशा शब्दात राऊतांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Sanjay Raut
Video Uddhav Thackeray: पवार-पटोलेंना 'शॉक'; उद्धव ठाकरेंचा नवा डाव ; मित्रपक्षांच्या मतदारसंघावरच घाव

पराभवानंतर बहीण आणि भाऊ आठवले

महायुती सरकारच्या योजनांवरही राऊत यांनी टीका केली. लोकसभेतील पराभवानंतर सरकारला लाडकी बहीण आणि भाऊ आठवायला लागले आहेत. तसेच विरोधकांनी या योजनांवर टीका केलेली नाही. तर सरकारी पैशांचे वाटप आणि त्यामाध्यमातून निवडणुकीचे जे राजकारण सुरू आहे, त्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत असल्याचं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Sanjay Raut
Ambadas Danve : 'संदिपान भुमरे आता मंत्री नाहीत, त्यांना घाबरण्याची गरज नाही', अंबादास दानवेंनी अधिकाऱ्यांना ठणकावले

बहिणीला किमान 10 हजार द्या

तसेच भावाला मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. मात्र, तरं बहिणीला जास्त मदत मिळायला पाहीजे. कारण बहीण घर चालवते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दीड हजारात काय होतं? किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत, असं राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com