Criticism of BJP : विकासाची पाटी कोरी अन् रंगवताहेत भिंती! भाजपवर कोणी केली 'ही' टीका

BJP is determined to make Narendra Modi the Prime Minister for the third time : गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
Pune
PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीकेची झोड उठवत आपली बाजू अधिक भक्कम कशी होईल, यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 'मोदी की गारंटी' म्हणत विविध योजनांची माहिती देणाऱ्या जाहिराती आणि फ्लेक्स हे जागोजागी लावण्यात येत आहेत. इतकेच नव्हे तर पुणे शहरातील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. या भिंतींवर भाजपचे कमळ, नरेंद्र मोदी यांचे फोटो छापण्यात आले असून, 'एक बार फिरसे मोदी सरकार' अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

Pune
MNS 18th Foundation Day : पवार कुटुंबात फूट? राज ठाकरे म्हणाले, 'आतून सगळे एकच...'

भाजप (BJP) च्या वतीने शहरातील विविध भागातील भिंतींवर करण्यात आलेल्या या 'कलाकुसरींवर' राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आक्षेप घेतला आहे. एका बाजूला स्वच्छ भारत मोहीम राबवायचे आणि दुसरीकडे शहरातील भिंती अशा घाण करायच्या हे कृत्य भाजपला शोभणारे आहे, अशी टीका आता केली जात आहे. भाजपने शहरात केलेल्या या उद्योगांचा निषेध करून वस्तुस्थिती पुणेकरांना सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पर्वती येथील मित्र मंडळ चौकात झालेल्या या आंदोलनासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. दहा वर्षांत देशावर वाढलेला कर्जाचा बोजा, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भारतातून बाहेर गेलेले उद्योगधंदे, महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, ढिसाळ निर्यात धोरणाने बळीराजाचे झालेले नुकसान, अशा सर्वच बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मत मागायला त्यांना लाज वाटते म्हणून भाजप 'दिवार लेखन' अभियान राबवित असल्याची टीका या वेळी करण्यात आली. शहरातील सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत, याचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. दहा वर्षे सत्ता उपभोगूनही विकासाची पाटी कोरीच असल्याने भाजपला निवडणुकीत मते मागण्यासाठी पुणे शहर रंगवून विद्रूप करण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही, अशी टीकादेखील जगताप यांनी केली.

(Edited by Amol Sutar)

R

Pune
Nana Patole At Pratapgad : प्रतापगडावर काय घडले? डॉ. पडोळेंच्या खांद्यावर नानांचा 'हात'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com