Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपावर संजय राऊतांची टीका; म्हणाले, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकल्यासारखेच...

Sanjay Raut महाविकास आघाडीतील घटक पक्षात एकाही जागेवरून संघर्ष, तणाव राहिला नाही. आमचे उमेदवार कामाला लागले आहेत. उद्या (गुरुवारी) आमची यादी तुमच्या हातात येईल, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
MP Sanjay Raut, Devendra Fadanvis
MP Sanjay Raut, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

MP Sanjay Raut News : महायुतीच्या जागावाटपावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड टीका केली आहे. ते म्हणाले, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. ते मांडलिक आश्रित असतात. त्यांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात, अशी सडेतोड टीका त्यांनी केली.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीत एकत्र असल्यामुळे आम्ही उद्या यादी जाहीर करू. उद्धव ठाकरे साहेबांनी सर्व उमेदवार निश्चित केले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचीही तयारी झाली आहे. एकाही जागेवरून संघर्ष, तणाव राहिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे उमेदवार कामाला लागले आहेत. उद्या (गुरुवारी) आमची यादी तुमच्या हातात येईल, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

वंचितशी निरंतर बोलणं सुरू...

वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबतची चर्चा संपलेली नाही. बहुजन वंचित आघाडी हा मविआतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांच्याशी आम्ही वारंवार संपर्क साधतोय. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात अकोल्याचाही समावेश आहे. तो त्यांना मान्य नाही. आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. वंचित आमच्यासोबत असायला हवी. आंबेडकरांशी निरंतर बोलणे सुरू आहे. त्यांच्याशी बोलले की प्रेरणा ऊर्जा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

MP Sanjay Raut, Devendra Fadanvis
Sanjay Raut News: राऊतांनी वाढवली इच्छुकांची धाकधूक | Shivsena UBT | Loksabha Election 2024

हुकूमशाही संपविणे हाच आमचा प्लॅन...

हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हातकणंगले व सातारा लोकसभेचा आढावा घेता आहेत. यावर आम्ही चर्चा करू, असे संजय राऊत यांनी सांगितले. सांगलीची जागा शिवसेना लढणार आहे, तर, भिवंडीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. या लोकसभा निवडणुकीत आमचा कुठलाही प्लॅन ए, बी वगैरे नाही. हुकूमशाही संपवणे हाच आमचा प्लॅन आहे.

महायुतीच्या जागावाटपावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. ते मांडलिक आश्रित असतात. त्यांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचे जागावाटप महाराष्ट्रतच होते. आम्हाला दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावे लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Sanjay Raut, Devendra Fadanvis
Sanjay Raut On Prakash Ambedkar: आंबेडकर सोबत नसले तरीही...; राऊतांचं मोठं वक्तव्य

जानकरांना भाजपने गळाला लावले...

महाविकास आघाडीसोबत चर्चा करणारे महादेव जानकर आता महायुतीत सहभागी झाले आहेत. याविषयी विचारले असता, संजय राऊत म्हणाले, भाजप त्यांना गळालाच लावतात आणि गाळात घालतात. तो जानकरांचा निर्णय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. मीही सभा घेतलीय, वेळ पडली तर उद्धव ठाकरेही जाहीर सभा घेतील. सुप्रियाताई जिंकून येणार असल्यानं तिथे कुणी लढायला तयार नाही, मग कुणालाही गळाला लावू द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

MP Sanjay Raut, Devendra Fadanvis
Mahadev Jankar Mahayuti : जानकरांनी पवारांना चकवले, महायुतीला मारली कडकडून मिठी, पाहा खास फोटो!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com