Satyapal Malik : विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया होणार, ठाकरेंना भेटलेल्या माजी राज्यपालांचा दावा

Satyapal Malik Meet uddhav thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला पाठींबा असून निवडणुकीत आपण प्रचार देखील करणार असल्याचे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
Satyapal Malik Meet uddhav thackeray
Satyapal Malik Meet uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Satyapal Malik News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. ठाकरे गट देखील निवडणुकीची तयारी करत आहे. आज (रविवारी) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सत्यपाल मलिक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया होणार असल्याचा दावा केला.

मलिक म्हणाले, या निवडणुकीत फक्त भाजपला फटका बसणार नाही तर त्यांचा सफाया होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महत्त्वाची भूमिका बजावतील.

सत्यमाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवर चर्चा झाली. ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने मलिक यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला पाठींबा असून निवडणुकीत आपण प्रचार देखील करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Satyapal Malik Meet uddhav thackeray
Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाचे काय झाले? एकनाथ खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला

सत्यपाल मलिक कोण?

सत्यमाल मलिक हे एकदा आमदार आणि खासदार राहिले आहेत. 2019 मध्ये ते जम्मू कश्मिरचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. त्याच काळात मोदींनी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. मलिका यांचा मोदींच्या या निर्णयला विरोध होता. शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला देखील मलिक यांनी पाठींबा दिला होता. बिहार, मेघालय, गोवा आणि ओडिशा या राज्यपाल म्हणून देखील मलिक यांनी काम पाहिले आहे.

शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

आगामी विधानसभा निवडणुकीची भाजपची रणनीती ठरवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विभागनिहाय बैठका घेत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी अमित शाह मैदानात उतरले असल्याचे भाजप नेते सांगत आहेत.

Satyapal Malik Meet uddhav thackeray
Gulabrao Patil : शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याने जाहीर सभेत सांगून टाकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com