Sharad Pawar news : 'गोकुळ'च्या घडामोडींवर शरद पवारांचे लक्ष, पहिला व्हिडिओ आला समोर

Gokul milk union,Kolhapur protest, Satej Patil, Supriya Sule, Gokul milk union election : कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul controversy news : गोकुळ जिल्हा दूध संघावर चार सदस्य नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला कोल्हापुरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सर्व विरोधी पक्षांतील नेतेही या मोर्चात सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही या मोर्चाकडे लक्ष्य आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात शरद पवारांचा एका व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे गोकुळच्या मोर्चाची माहिती वृ्त्तवाहिनीवरून घेत असल्याचे दिसत आहे.

खासदार सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'गोकुळ' दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे.

कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरच्या जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे, असे खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, संघर्ष मोर्चामध्ये बोलताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील चार सदस्यांच्या नियुक्तीच्या वटहुकुमाला टेस्ट ट्यूब बेबी म्हटले. ही टेस्ट ट्यूब बेबी मागे घ्या. बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो गोकुळचा विकास होईल, तो विकास सरकारने स्वीकारला पाहिजे. लोकशाहीची हीच पध्दत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.