Sharad Pawar : फडणवीसांनी 'बालसाहित्य' म्हणून हिणवलेल्या संजय राऊतांच्या पुस्तकावर शरद पवारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले....

Sanjay Raut Narkatla swarg Book : संजय राऊत यांनी नियमित रोखठोक भूमिका मांडली. हे काही लोकांना मान्य नव्हतं. त्यांची ही लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते. बहुतेक संधीची वाटच पाहत होते. त्यांना संधी पत्राचाळ प्रकरणाने दिली.
Sharad pawar devendra fadnavis sanjay raut .jpg
Sharad pawar devendra fadnavis sanjay raut .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पुस्तकात राऊतांनी अनेक धक्कादायक राजकीय खुलासे केले असल्याचं बोललं जात आहे. पण दुसर्‍या बाजूला या पुस्तकावर भाजपसह सत्ताधारी पक्षांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर या पुस्तकाला बालसाहित्य म्हणत हिणवलं होतं. मात्र,या पुस्तकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

खासदार संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग'पुस्तकाचं प्रकाशन सोहळा शनिवारी(ता.17) पार पडले. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार शरद पवार यांनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी या कार्यक्रमात भाषण करत सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या यंत्रणांवरही टीकास्त्र डागले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांवरही निशाणा साधला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी बालसाहित्य वाचत नाही,अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. हाच संदर्भ घेत शरद पवार यांनी फडणीसांचे नाव न घेता चिमटा काढला.

ते म्हणाले, संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे गेल्या दोन दिवसांपासून ऐकत आहोत. पण मला आश्चर्य वाटतं की, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? या पुस्तकासह राऊतांवरही गेल्या दोन दिवसांपासून टीका केली जात आहे.कोणी सांगितलं, मी बालसाहित्य वाचत नाही.कोणी आणखी काही टीका करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sharad pawar devendra fadnavis sanjay raut .jpg
Sanjay Raut Speech : जेलमध्ये असताना कोश्यारींवर रोखठोक प्रसिद्ध झाले अन्‌ रात्री साडेअकराला दोन अधिकाऱ्यांनी मला झोपतून उठवले

पवार म्हणाले, लोकशाहीचा अभ्यास,तिच्यावर प्रेम करणारे आणि लोकप्रतिनिधींना या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून शिकायला मिळेल.सत्तेचा गैरवापर कसा केला जातो आणि त्याविरोधात लढायचे कसे याचा उत्तम पाठ यात असल्याचे कौतुकोद्गारही शरद पवार यांनी यावेळी काढले.

तसेच या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद यावेत.सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचे बळ मिळेल, न्यायव्यवस्था ही आदर्श असायला हवी,ती ईडीच्या हातातील बटीक व्हायला नको याचा धडा यातून मिळेल, असे परखड मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

Sharad pawar devendra fadnavis sanjay raut .jpg
Rahul Gandhi News: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ; राहुल गांधींनी 'ऑपरेशन सिंदूर'वरुन मोदी सरकारला घेरलं..

संजय राऊत यांनी नियमित रोखठोक भूमिका मांडली. हे काही लोकांना मान्य नव्हतं.त्यांची ही लेखणी काही लोकांना पचत नव्हती.ते अस्वस्थ होते. बहुतेक संधीची वाटच पाहत होते.त्यांना संधी पत्राचाळ प्रकरणाने दिली. पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते.यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे, असंही ते म्हणाले.

मात्र, ईडीनं जी केस केली.त्यात राऊतांचा काहीही संबंध नसताना त्यांना गुंतवण्याचं काम केलं.जिथे अन्याय होतो,अत्याचार आहे, त्याच्या विरोधात सामना उभा राहतो. हे अखंडपणे काम सुरू होतं, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगातील अनेक आठवणी सांगितल्या. आर्थर रोड तुरुंगात मी कसाबच्या बरॅकमध्ये राहिलो, ते बॅरक कोणी बनविले? त्याचे उत्तर दिल्यानंतर सभागृहात प्रचंड हास्यकल्लोळ उडाला आणि बाहेर आल्यानंतर ते बरॅक कसं होतं? हेही विचारलं, अशी आठवण खासदार संजय राऊत यांनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com