
Mumbai, 17 May : मी ईडीच्या कोठडीत असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर रोखठोक प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. त्या रात्री साडेअकराच्या सुमारास दोन अधिकारी आले आणि मला झोपेतून उठवून म्हणाले, ‘तुमचा जबाब घ्यायचा. ‘सामना’मध्ये तुमचा लेख प्रसिद्ध झाला, तो तुरुंगाच्या बाहेर कसा आला? याची चौकशी करायची आहे, तसे आम्हाला वरून ऑर्डर आहे,’ अशी आठवण खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात सांगितली.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राऊत यांनी पुस्तकासंदर्भातील आठवणी सांगितल्या.
मी ईडीच्या कोठडीत असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर ‘सामना’मध्ये रोखठोक प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. संजय राऊत तर जेलमध्ये आहेत, रोखठोक कोणी लिहिले? अशी चर्चा सुरू झाली. त्या रात्री साडेअकराला दोन अधिकारी माझ्याकडे आले आणि तुमचा जबाब घ्यायचा, असे सांगितले. ‘कशासाठी ’असं मी विचारलं.
तुम्ही जेलमध्ये बसून चार दिवस झाले आहेत आणि तुमचा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख बाहेर कसा गेला, त्याची चौकशी करण्याचे वरुन आदेश आहेत, असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्याकडे सीसीटीव्ही आहेत, तुम्हीच बघा आणि चौकशी करा, असे मी त्यांना सांगितले. पण, मी तुरुंगात जाण्याच्या अगोदरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर लेख लिहून ठेवला होता अशा अनेक घटना पुस्तकात आहेत, असेही राऊतांनी सांगितले.
राऊत म्हणाले, नरकातील स्वर्ग या पुस्तकावर सध्या चर्चा होत आहे, ती झालीच पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना मिरच्या लागल्या आहेत. पण मी जे काही लिहिले आहे, ते सत्य आहे. माझी ओळख बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली. सत्य आणि नीतीमत्ता या दोन गोष्टींची कास सोडू नको, हे बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितले, ते मी शेवटपर्यंत पाळेन.
‘जो बात करनेसे डरते हे लोक, ते तू लिख’ हे जावेद अख्तर यांनी सांगितले आहे. ते आम्ही करत आहोत. आम्ही वाकणार नाही. साकेत गोखले वाकले नाहीत. संजय सिंह झुकले नाहीत. आमचे अनिल देशमुख झुकले नाहीत. जुलमी शासन व्यवस्थेच्या पुढे झुकायचे नाही, लढत राहायचे असं आम्ही ठरवलं. कोणीतरी लढलं पाहिजे. जेलमध्ये असताना मी अनिल देशमुख यांना सांगितले की, वेळ घालावयचा असेल तर काहीतरी लिहा. त्या प्रमाणे त्यांनीही पुस्तक लिहिले आहे.
जेलमध्ये गेलेला माणूस बॅरिस्टर होऊनच बाहेर पडतो
तुरुंगात गेल्यावर जगाशी तुमचा संपर्क तुटतो. आतमध्ये दगडाच्या भींती बघायच्या. त्या काळात लिहणं, वाचणं आणि सकारात्मक विचार करायचं, असं ते जीवन होतं. जेलमध्ये गेलेला माणूस बॅरिस्टर होऊनच बाहेर पडतो, असेही राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांनी त्यांना सुंदर नावे ठेवली होती
खासदार राऊत म्हणाले, आर्थर रोड तुरुंगात मला एक ससा दिसला. त्यावर कुदंन शिंदे म्हणाले, साहेब तो ससा नसून उंदीर आहे. तुरुंगात मोठमोठे उंदीर, घुशी फिरायचे. अनिल देशमुखांनी त्यांना सुंदर नावे ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही; कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्या तुरुंगातील दिवसांमुळे हे पुस्तक तयार झाले.
शरद तांदळे आता ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा
शरद तांदळे आता ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण, यापुढे ईडी आपल्या दारात येणार नाही. कारण मी बूच लावून ठेवले आहे. ईडी नादाला लागलेली मी महाराष्ट्रातील शेवटचा माणूस होतो. तुरुंगातील कटू आठवणी असल्या तरी मी ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला कधीही खचू नका, अशी शिकवणी दिली आहे, त्यामुळे आम्ही कायम सकारात्मक राहिलो आहोत, असेही राऊतांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.