मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा पॅटर्न बदलणार ; शिंदे म्हणाले..

लालफितीमध्ये आमची कामे अडकणार नाहीत, जागेवरच कामे होतील, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आमचं सरकार करेल,"
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच काल (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde Eknath) यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. (Eknath Shinde news update)

मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन सूचना दिल्याने आता मुख्यमंत्र्यांचा काम करण्याचा पॅटर्न बदलणार का ? अशी चर्चा सुरु आहे. याबाबत शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शिंदे म्हणाले,"हे राज्य सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, ते मदतीपासून वंचित राहणार नाहीत, ही काळजी राज्य सरकार घेईल. लालफितीमध्ये आमची कामे अडकणार नाहीत, जागेवरच कामे होतील, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आमचं सरकार करेल,"

Eknath Shinde
उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदाराला झटका ; तानाजी सावंत यांना पदावरून हटवलं

"आम्ही हे राज्य लोकशाहीच्या माध्यमातून स्थापन केलं आहे. या राज्यात कायदा, घटना, नियम आहे, त्याच्याबाहेर कुणाला जाता येत नाही. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. आकड्यांना महत्व असतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवारी आनंद दिघे यांच्या विचाराचं सरकार या राज्यात स्थापन केलं आहे. आम्ही कायदेशीर सरकार स्थापन केलं आहे. आमचं सरकार बेकायदेशीर असल्याची मागणी कोणी केली असेल तर न्यायालय त्याबाबत निर्णय देईल. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे," असे शिंदे म्हणाले.

दिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. त्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, "देशातील संविधानिक जी पदे आहेत, पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांनी आम्ही भेटलो आहे. केंद्र सरकार आपल्या पाठिंशी राहावं, त्यांची मदत व्हावी, यासाठी ही सदिच्छा भेट होती,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com