Shirish Chavan News : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण (64) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्धव ठाकरे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. शिरीष चव्हाण यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शिरीष चव्हाण हे शिवसेनेचे वसई तालूका प्रमुख म्हणून ही काम पाहिले होते.
दरम्यानच्या काळात ते नालासोपारा नगरपरिषदेचे नगरसेवक ही होते. त्याच बरोबर वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर पहिल्याच टर्ममध्ये ते शिवसेनेचे गटनेते होते.
पंधरा दिवसापूर्वी शिरीष चव्हाण यांच्या मातोश्रीचं देखील निधन झालं होते तर चव्हाण कुटूंबीयांना हा दुसरा धक्का आहे.
lत्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद ही सांभाळले होते. त्यांच्या निधनानंतर माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील आणि शिवसेनेचे विद्यामान जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत यांनी शोक प्रकट केला.
तत्कालीन नवघर माणिकपूर नागरपरिषदेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रामचंद्र तळेकर (वय 93) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.वसई विरार महानगरपालिकेचे सचिव विश्वनाथ तळेकर यांचे ते वडील,त्यांच्या मागे 2 मुले,सहा मुली,सुना ,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र तळेकर हे सामाजिक ,शैक्षणिक याच्या बरोबरच सहकार क्षेत्रातही ते कार्यरत होते.गणेश कृपा सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव पद त्यांनी बराच काळ भूषविले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.