Uddhav Thackeray News : ''अमित शाहांना महाराष्ट्रात येवून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे करावे लागते''

Shiv Sena Founders Day : उद्धव ठाकरे यांची भाजपावर चौफेर टीका
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena News : शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेताहेत. मी तुम्हाला सांगितले होते, आव्हान आणि शिवसेना हे नवीन नाही. आजपर्यंत अनेकांनी आव्हान दिले. आपली आव्हांनांची लेव्हल वाढत जात आहे. आजपर्यंत अनेक आव्हाने आले. शिवसेनिकांचा पुत्र म्हटल्यानंतर जसी आव्हान त्यांनी पेलली, त्याच प्रमाणे हे आव्हान मी तुमच्या साथीने परतवणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा (Shivsena) आज ५७ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबईमध्ये बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी उमेद कधी हरलोच नाही. आपले नाव त्यांनी घेतले. वडिल चोरायला निघाले होते. काल काही गेले आहेत. ज्यांना जायचे आहे ते जा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पीक कापून नेले तरी शेती आमच्याकडे आहे. या सगळ्यांच्या जोरावर आपण पुन्हा उभे राहू, ५७ वर्ष तुम्ही जी मेहनत घेतली ती आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Uddhav Thackeray News
News Arena India Survey - Vidarbha: विदर्भात भाजपाला सर्वाधिक जागा; काँग्रेसलाही फायदा, ठाकरेंना फटका...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) महराष्ट्रात यावे लागते. महाराष्ट्रात येवून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे कारावे लागते. सगळे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे एकटा नाही, हे पुढे बसले सगळे उद्धव ठाकरे आहेत. तिकडे जपानमध्ये भूकंप झाला नाहीतर लोकांना धक्का बसतो. तरीही जपान उभा राहिला आहे. तुमच्या साथीने आपण पुन्हा उभे राहू, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी आत्ता हास्यजत्रेच्या कलाकारांना भेटलो. त्यांना मी म्हटले की तुम्ही आम्हाला हसवले. आमच्या राजकीय व्यक्तींची हास्यजत्रा सुरुच असते. कालच हास्यजत्रेचा एक प्रयोग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सादर केला. त्यांचा प्रयोग सांगितल्यावर किती हसाल असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News
News Arena India Survey : भाजपाच्या आकाश फुंडकरांना अन् शिंदे गटाच्या संजय गायकवाडांना बसणार धक्का; काँग्रेसला लागणार लॉटरी...

या वेळी त्यानंतर कोव्हिडची व्हॅक्सिन मोदीजींनी तयार केली. हे देवेंद्र फडणवीसांच्या वाक्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे हे माहित नाही. कोरोनाची लस मोदीजींनी तयार केली, मग बाकीचे संशोधक काय गवत उपटत होते का? असा टोलाही ठाकरेंनी लगावला. असे अंधभक्त व त्यांचे गुरु म्हटल्यावर त्यांना व्हॅक्सिन द्यायची गरज आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com