उद्धव ठाकरेंचे ठरले; एकनाथ शिंदेंच्या बंडाचा ठाण्यात जाऊन घेणार समाचार

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यभरात 'महाप्रबोधन यात्रा' काढणार आहेत
Eknath Shinde & Uddhav Thakre
Eknath Shinde & Uddhav ThakreSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेनेला (Shivsena) पुन्हा नवी उभारी देण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरवात ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या होम ग्राऊंडवरुन करणार आहेत. ठाकरेंची पहिली जाहिर सभा ही ठाण्यातील टेंभी नाक्यावर होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बंडखोरांना काय इशारा देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवानंतर राज्यभरात स्वतः उद्धव ठाकरे 'महाप्रबोधन यात्रा' काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात ठाण्यातू होणार असून शेवटची सभा कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार आहे. या यात्रेची सध्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या 'शिव'संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर सभा घेत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची यात्र होणार आहे.

Eknath Shinde & Uddhav Thakre
गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना फटकारल्याचे ठाकरेंकडून कौतुक; म्हणाले,तो कोण होता...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत नेले आहे. त्यामुळे शिवसेनेत आता पर्यंतचे सर्वात मोठे बंड झाले आहे. त्यातच शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. त्याचा वाद निवडणूक आयोगात पोहचला आहे. त्यामुळे शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वत: राज्याचा दौरा करणार आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आदित्य बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या दौरा केल्यास बंडखोर आमदारांची डोकेदुःखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आदित्य यांच्या सभांना होणारी गर्दी पाहता उद्धव ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com