मुंबई : शिवसेनेने आधी हिंदूत्व सोडले, आता भगव्या ध्वजाचाही विसर पडेल आणि शिवसेना (Shivsena) हिरवा झेंडा हाती घेईल, अशी घणाघाती टीका भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर आता भाजप (BJP) महाराष्ट्रात युतीचे राजकारण करणार नसून स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (BJP-Shsivsena latest political news today)
यावेळी त्यांनी आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह २०२४ च्या निवडणुकांची तयारी, युतीचे राजकारण, महाविकास आघाडी सरकारचे यशापयश या मुद्द्यावरही स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेशी युती होती, तेव्हाची भाजपची आणि राजकीय परिस्थितीही वेगळी होती. पण आता भाजपची ताकद वाढली आहे. आता भाजप कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढणार नाही, भाजप मुंबई महापालिकेतही स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेसाठीही शिवसेनेशी युती केली होती. पण आता कोणत्याही पक्षाशी युती न करता भाजपला स्वबळावरच सत्ता मिळवायची आहे, असे भाजपने ठरविले आहे. भाजपने शिवसेनेशी हिंदूुत्वाच्या मुद्द्यावर युती केली होती. पण आता शिवसेनेने हिंदूत्व सोडले आहे. सत्तेसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्यांबरोबर संगत केली आहे. शिवसेनेने भगवा विसरून हिरवा झेंडा हाती घेतला आहे. आता ते मुस्लिम धर्मियांची टोपीही घालतील. अशी टिकाही रवी यांनी केली.
केंद्र सरकार अल्पसंख्यांक समाजासाठी कोणताही भेदभाव न करता अनेक योजना आमलात आणत आहे. आज अल्पसंख्याक समाजाला केंद्र सरकारच्या सर्व योजना व निर्णयांचाही लाभ होत आहे. भाजप नेहमीच राष्ट्रहिताचा विचार करते, पण मुस्लीम धर्मीय निवडणुकीत धर्माचा विचार करतात आणि भाजपबरोबर येत नाहीत, असेही रवी यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना उपाययोजनांसह सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. आघाडी सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. पण आज जनतेचा भाजपवर विश्वास आहे, राज्य सरकारवर नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालातच आपण हे पाहिले, आता हे पुढील निवडणुकांमध्येही दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.