'पेगासस'वर मोदी बोलतील का? राऊतांचा सवाल

आमच्या बँक खात्याच्या व्यवहारांची माहिती देखील घेतली जात आहे. आणीबाणीपेक्षा ही भयंकर परिस्थिती सध्या आपल्या देशांमध्ये आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : इस्त्रायली कंपनी, एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरने भारतातील 300 हून अधिक मोबाईल नंबरला लक्ष्य केले, ज्यामध्ये सध्याच्या सरकारचे दोन मंत्री, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, अनेक पत्रकार आणि बरेच व्यापारी यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. न्यूर्याक टाईन्सने याबाबत वृ्त्त आज दिले आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, 'पेगाससच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत आहोत. गेल्या अधिवेशानात मोदी सरकारनं (Modi government) या विषयावर संसद चालू दिली नाही. आम्हाला बोलू दिले नाही. आता न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तानंतर सत्य समोर आले आहे. आमच्या सारख्या हजारो लोकांचे फोन हे पाळती खाली आहेत,''

''आमच्या बँक खात्याच्या व्यवहारांची माहिती देखील घेतली जात आहे. आणीबाणीपेक्षा ही भयंकर परिस्थिती सध्या आपल्या देशांमध्ये आहे. त्यामुळे लोकशाही कुठे आहे, असा प्रश्न पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या देखील प्रमुख नेत्यांवर पाळत ठेवली आहे. मोदी यावर बोलतील का,'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut
आमदाराला अश्रू अनावर! ७० हजारांचे कमळ, नोकरीचा राजीनामा, तरीही तिकीट कापलं!

राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, ''सत्यवचन देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, ते सत्य वचनी नाहीत. वाईन विक्रीबाबतचा निर्णय बहुमताने घेतला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार असे निर्णय बहुमताने घेत असतात. विरोधी पक्ष बोलतो ती प्रत्यक्ष गोष्ट मनावर घेतली पाहिजे असं नाही. हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. सरकारच्या महसूल यामध्ये वाढ व्हावी यासाठी आहे,''

‘वाईन’मुळे महाराज्य ‘मद्यराष्ट्र’ होईल असं बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण!

मुंबई : राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात (Thackeray Government)आले.

या निर्णयावरुन विरोधक भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com