Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संजय राऊतांचं सरकारला आवाहन, म्हणाले...

Maharashtra Assembly Session : विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं, सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असं आवाहन राऊतांनी केलं.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: दिल्लीतील शेतकरी आंदोलन, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न, ईव्हीएम विरोधात आंदोलन, अशा विविध विषयांवर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने सोडवावा आणि विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं, तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असं आवाहन राऊत यांनी केलं. (Maratha Reservation in Assembly special session 2024)

'देशात जे सरकार विरोधात लढतात, त्यांना तपास यंत्रणाचा वापर करून त्रास दिला जात आहे. आमच्यासारख्या प्रखर बोलणाऱ्यांना या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काळ्या पैशाचा वापर करून खासदार, आमदार खरेदी केले जात आहेत', असा गंभीर आरोप राऊतांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्ष हुकूमशहा म्हणू लागले असल्याची टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Vishesh Adhiveshan : मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार? विशेष अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष

शेतीमालाला हमीभाव मिळावा, तसेच स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे भेट देण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत माहिती घेतली असून, ही माहिती उद्धव ठाकरे यांना सांगितली जाईल, यानंतर निर्णय होईल. पण दिल्लीत उभं केलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील आहेत, असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत खासदार संजय राऊत यांनी मोदींची तुलना पुतिन यांच्याशी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या बाबतीत पुतिन यांच्यापेक्षा वेगळं काय करतात? असा सवाल करत हल्लाबोल केला. तसेच देशात सुरू असलेल्या 'ईडी', 'सीबीआय'च्या कारवाईवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Sanjay Raut
Vishesh Adhiveshan : मराठा आरक्षणावर सभागृहात सर्वांना बोलण्याची संधी नाहीच! भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com