Sanjay Raut : चंद्रकांतदादाचं राऊतांनी केलं "अभिनंदन" ; भाजपला कानपिचक्या

चंद्रकांतदादा हे मुळचे कोल्हापुरकर आहेत, त्यांनी असं विधान करुन भाजपला कोल्हापूरचं पाणी दाखवलं आहे.
sanjay raut, chandrakant patil
sanjay raut, chandrakant patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना मुख्यमंत्री केले.आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता," असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी काल (शनिवारी) केले. त्यांच्या विधानावर पडसाद उमटत आहेत. (sanjay raut news update)

चंद्रकांत पाटील यांचं हे भाषण माध्यमांमध्ये आल्यानंतर सगळ्या सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आलं. तर आपल्या सगळ्यांचे नेते हे एकनाथ शिंदेच आहेत, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल सांयकाळी पनवेल येथे भाजपच्या बैठकीत सावरासावर केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चंद्रकात पाटलांवर टीका केली. "दगड डोक्यावर ठेवला की छातीवर. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे," असे म्हणत पवारांनी चंद्रकांतदादांवर टोलेबाजी केली. त्यानंतर आता शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी चंद्रकांत पाटलांचे "अभिनंदन"करत भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. राऊत माध्यमांशी बोलत होते.

sanjay raut, chandrakant patil
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

संजय राऊत म्हणाले, "चंद्रकांतदादा हे मुळचे कोल्हापुरकर आहेत, त्यांनी असं विधान करुन भाजपला कोल्हापूरचं पाणी दाखवलं आहे. महिनाभरापासून त्यांच्या पोटात ही मळमळ होती, ती आता ओठांवर आली आहे. भाजपमध्ये त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला," "भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र नाही, तरी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन,"अशा शब्दात राऊतांनी भाजपला चिमटा काढला.

राऊत म्हणाले, "चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार टिकणार नाही. आधी सरकार स्थापन करा मग बोला. मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. कारण भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भाजपमध्ये मनमोकळं बोलता येत नाही. चंद्रकांत पाटील खरं बोलल्याने त्यांचं अभिनंदन,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com