Shivsena UBT : दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा पहिला डाव; शिवाजी पार्कसाठी 'बीएमसी'कडे केला अर्ज

Shivsena UBT Dasara Melava Shivaji Park : 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाने दसरा मेळाव्यासाठी खूप आधीपासून तयारी सुरु केली आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दावा करण्याआधीच ठाकरे गट तयारीला लागला आहे.
Shivsena UBT Dasara Melava
Shivsena UBT Dasara MelavaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Sep : 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाने दसरा मेळाव्यासाठी खूप आधीपासून तयारी सुरु केली आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दावा करण्याआधीच ठाकरे गट तयारीला लागल्याचं दिसत आहे.

शिवाय यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 8 महिन्यांआधीच मुंबई महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. तर स्थानिक विभाग प्रमुखांनी यासाठी 3 वेळा स्मरणपत्रही दाखल केलं आहे.

शिवाय येत्या दोन ते तीन दिवसात आणखी एक स्मरणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं सांगितंल जात आहे. शिवसेना (Shivsena) आणि शिवाजी पार्क हे जसं एक समीकरण बनलं आहे. तसंच सेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क मैदान याचीही मोठी परंपरा आहे. मात्र, शिवसेनेतील फूटीनंतर मात्र शिंदे गट आणि ठाकरे गटात या मैदानावरून बराच वाद झाला.

Shivsena UBT Dasara Melava
Video Amol Kolhe : महाराष्ट्रात 'साहेब' कोण? अजितदादांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हेंनी सांगितली दोन नावं

शिवसेनेच्या फुटीनंतरच्या पहिल्याच मेळाव्यासाठी खरी शिवसेना आमचीच असून या मैदानावर दसरा मेळावा आम्हीच घेणार अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. तर आम्हालाही हेच मैदान पाहिजे ते आमचं पारंपारिक मैदान आहे, शिवाय या संदर्भातील सर्व कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने केला होता. त्यामुळे अखेर उच्च न्यायालयाच्या मध्यस्तीनंतर शिवतीर्थावर मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली होती.

Shivsena UBT Dasara Melava
Yamini Jadhav : मुस्लिम महिलांना बुरखा का वाटला? शिंदें गटाच्या आमदाराने सांगितले 'हे' कारण

अशातच आता शिंदे गटाने या शिवाजी पार्क मैदानावर दावा करू नये. यासाठी ठाकरे गटाने सावध भूमिका घेत पालिकेला अर्ज केले आहेत. त्यामुळे शिंदेंच्या आधीच ठाकरेंनी पहिला डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे. तर आगामी विधानसभेच्या तोंडावरच ठाकरेंचा हा दसरा मिळावा शिवाजी पार्कवर पार पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com