Friendship Day चे निमित्त साधून शिवसेनेतील बड्या नेत्याचा शिंदे गटापुढे मैत्रीचा हात

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray : या मैत्रीच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचा गट कसा प्रतिसाद देणार?
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष दोन गटांत विभागला आहे. पक्ष आणि चिन्ह यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आमनेसामने आला आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची यावरुन न्यायालयात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशात शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बाजू घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या का अशी चर्चा होत आहे.

त्याचवेळी आजच्या फ्रेंझशीप डे दिवशी शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने शिंदे गटापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मात्र या मैत्रीच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचा गट कसा प्रतिसाद देणार? आमदार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करुन परतणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
'मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले!'

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने केसरकरांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, फार उशीरा का होईना पण त्यांना शहाणपण आलेले आहे. मला वाटतं हीच भूमिका त्यांनी आधी घेतली असती तर ही वेळच आली नसती. मला वाटतं ही वेळ आली नाही आली, जुळवून घेतले पाहिजे की नाही हे वेगळं आहे. पण आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य असेल तर त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे अजुनही खुले आहेत. याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी उद्या लगेच बोलू असं नाही. पण ही गोष्ट याआधीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील स्पष्ट केले आहे असेही अहिर म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
आजच्या देवेंद्र फडणवीसला ओबीसी बांधवांनीचं बनवलं आहे : उपमुख्यमंत्र्यांचे दिल्लीत विधान

यावेळी अहिर यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आता मंत्रालय म्हणायचे की सचिवालय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात पुरस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत आहे. प्रशासनावर कोणाचा धाक राहिला नाही. जीआरची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी मंत्री, पालकमंत्री लागतात. याचा अर्थ असा आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं असं सुरू आहे. अन्यथा जाहीर करावं की, आम्ही दोघेच सरकार चालवू, अशी मागणीही अहिर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com