Sanjay Raut : "...तर एका रात्रीत भाजप संपेल", संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Prakash Ambedkar : "घटनेचं, लोकशाहीचं रक्षण करून मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा पराभव करणं हे आमच्याइतके प्रकाश आंबेडकरांचंही कर्तव्य आहे."
sanjay raut bjp
sanjay raut bjpsarkarnama
Published on
Updated on

आपआपल्या जिल्ह्यातील इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, असं विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे. "भाजपत गेलेल्या लोकांनी ठरवलं, तर एका रात्रीत पक्ष संपेल," अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Sanjay Raut On Bjp Latest News )

sanjay raut bjp
Ravindra Waikar : शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच वायकरांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत म्हणाले, "कितीही पक्ष संपवण्याची भाषा केली, तरी ते शक्य नाही. तुमचा पक्ष 2024 नंतर राहतो का? ते बावनकुळेंनी पाहावे. भाजप पूर्ण काँग्रेसमय झाला आहे. भाजपात गेलेल्या लोकांनी ठरवलं, तर एका रात्रीत पक्ष संपून जाईल. 303 खासदारांपैकी फक्त 110 लोक मूळ भाजपचे आहेत. सगळ्या खासदार, आमदारांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, तर हा देश भाजपमुक्त होईल. हे बावनकुळेंना माहिती नसावं."

"भाजप टिकवण्यासाठी बावनकुळेंना शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची गरज लागत आहे. ही तुमची ताकद परावलंबीत आहे. तुमची भूमिका हुकूमशाहीला पुढे नेणारी आहे. हुकूशाहीविरोधात उभे राहणाऱ्या लहान पक्षांना संपवायचं आणि मोठ्या पक्षांना फोडायचं ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक आहे. 2024 च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवतय, कोण मैदानात राहतंय आणि कुणाला जनतेकडून लोकशाहीत गाडलं जातंय हे कळेल," असा सूचक इशारा राऊतांनी बावनकुळेंना दिला.

sanjay raut bjp
Shrikant Shinde : "CM शिंदेंनी माझ्याविरोधात लढावे", ठाकरेंच्या आव्हानावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "आपली..."

"प्रकाश आंबेडकर आणि वंचित महाविकास आघाडीचा घटक आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतात. देशात संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे. हे प्रकाश आंबेडकरांइतके कुणाला माहिती नाही. आम्ही सगळे संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करत आहोत," असं राऊतांनी सांगितलं.

sanjay raut bjp
Imtiaz Jaleel : "...तर मी अमरावतीतून निवडणूक लढण्यास तयार," जलीलांचं राणांना प्रत्युत्तर

"मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी सर्व राजकीय एकत्र आले आहेत. उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण, त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गावर जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. घटनेचं, लोकशाहीचं रक्षण करून मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा पराभव करणं हे आमच्याइतके प्रकाश आंबेडकरांचंही कर्तव्य आहे. 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी बैठकीला येण्याचं मान्य केलं आहे," अशी माहिती राऊतांनी दिली.

sanjay raut bjp
BJP Nasik Politics: भाजप आजमावणार ताकद, ३३ वर्षानंतर देणार नाशिकमध्ये उमेदवार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com