
BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना नेते, खासदार श्रीकांत शिंदे अॅक्टिव्ह झाले आहेत. यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'मातोश्री' निवासस्थान असलेल्या वांद्रे भाग त्यांच्या रडारवर आहे. याच भागात बैठक घेऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांना ते कामाला लावणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण आता अधिक तापताना दिसणार आहे.
श्रीकांत शिंदे हे 10 आणि 11 एप्रिल रोजी मुंबईतील 2 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. 10 एप्रिलला चेंबूरच्या एकर्स क्लबमध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील माहीम, धारावी, वडाळा, अणुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा मतदारसंघाचा, तर 11 एप्रिल रोजी उत्तर मध्यमधील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना व चांदिवली मतदारसंघाचा आढावा वांद्रे एमआयजी क्लब येथे आढावा घेणार आहेत.
शिवसेनेसोबतच भाजपनेही महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईत यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहापैकी तीन जागा लढविल्या होत्या. यातील मुंबई उत्तर वगळता भाजपचा दोन्ही जागांवर पराभव झाला. पण विधानसभा निवडणुकीमध्ये कमबॅक करत भाजपने 15 जागांवर दणदणीत विजय मिळविला.
विधानसभेच्या निवडणुका संपताच भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली होती. 1 जानेवारीपासून भाजपने मुंबईसह महाराष्ट्रात सदस्य नोंदणी मोहीम सुरु केली होती. गत आठवड्यापर्यंत भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली. यात मुंबईतही मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. 2017 मध्ये भाजपने तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या. यंदा यापेक्षा जास्त जागा जिंकून महापौर बनविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.